व्ही. जी. सिद्धार्थ : मॅनेजमेंट ट्रेनी ते कॉफी सम्राट

वृत्तसंस्था
बुधवार, 31 जुलै 2019

12 हजार एकर : कॉफी मळे 
8,200 कोटी रुपये : एकूण संपत्ती 
1996 साल : "सीसीडी'चे पहिले स्टोअर बंगळूरमध्ये 
1700 : देशभरातील सीसीडी 
48 हजार : व्हेंडिंग मशिन 
532 : किऑस्क 
403 : कॉफी विक्रीची दुकाने 
4264 कोटी रुपये : वार्षिक उलाढाल 

बेळगाव : देशातील लोकप्रिय कॉफी श्रृंखला असलेल्या 'कॅफे कॉफी डे'चे संस्थापक संचालक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा आज (बुधवाऱ) मृतदेह सापडल्याने उद्योग वर्तुळात खळबळ उडाली आहे. देशातील सर्वांत मोठे कॉफी साम्राज्य उभे करण्याचा मान पटकावणारे सिद्धार्थ कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांचे जावई होते. 

सिद्धार्थ यांनी वयाच्या 24 व्या वर्षी 1983-84 मध्ये त्यांनी मुंबईतील जेएम फायनान्सियल लिमिटेडमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून कामाला सुरवात केली. 1985 मध्ये ते 10 हजार एकर कॉफी मळ्याचे मालकही होते. मात्र, 1990 मध्ये उदारीकरणानंतर एका वर्षातच त्यांनी कॉफी मळ्यांतील गुंतवणूक दुप्पट केली. 1993 मध्ये त्यांची कंपनी देशातील दुसऱ्या क्रमांकाची कॉफी निर्यातदार कंपनी बनली. 
सीसीडीव्यतिरिक्‍त सिद्धार्थ यांनी सेराई आणि सिसाडा ही सेव्हन स्टार रिसॉर्टही चालवत होते. बंगळूरमधील 'माइंडट्री' या सॉफ्टवेअर कंपनीचे ते सहसंस्थापकही होते. 

प्राप्तिकर छापे 
2017 मध्ये त्यांच्यावर करचुकवेगिरीचा आरोप ठेवण्यात आला होता. त्यासाठी प्राप्तिकर खात्याने त्यांच्या मुंबई, बंगळूर, चेन्नई व चिक्‍कमगळूरसह 20 ठिकाणी छापे टाकले होते. तर सीसीडीवर टाकलेल्या छाप्यातून 650 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता व कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. 

12 हजार एकर : कॉफी मळे 
8,200 कोटी रुपये : एकूण संपत्ती 
1996 साल : "सीसीडी'चे पहिले स्टोअर बंगळूरमध्ये 
1700 : देशभरातील सीसीडी 
48 हजार : व्हेंडिंग मशिन 
532 : किऑस्क 
403 : कॉफी विक्रीची दुकाने 
4264 कोटी रुपये : वार्षिक उलाढाल 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CCD founder VGSiddhartha life journey