गोव्यातील रस्त्यांवर आता 24 तास राहणार पोलिसांची नजर

अवित बगळे
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

गोव्यात रस्त्यावर वाहतूक पोलिस दिसत नाहीत म्हणून नियमभंग करण्याचा विचार वाहनचालकाने करत त्याची अंमलबजावणी केली तर यापुढे दंडाची नोटीस घरी आलीच म्हणून समजा. गोव्यातील सगळ्या रस्त्यांवर सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत. सध्या शहरात असे सीसीटीव्ही बसवले आहेत. नियमभंग करणाऱ्यांना टपालाने दंड भरण्याची नोटीस पाठवणे सुरू केले आहे.  

पणजी : गोव्यात रस्त्यावर वाहतूक पोलिस दिसत नाहीत म्हणून नियमभंग करण्याचा विचार वाहनचालकाने करत त्याची अंमलबजावणी केली तर यापुढे दंडाची नोटीस घरी आलीच म्हणून समजा. गोव्यातील सगळ्या रस्त्यांवर सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत. सध्या शहरात असे सीसीटीव्ही बसवले आहेत. नियमभंग करणाऱ्यांना टपालाने दंड भरण्याची नोटीस पाठवणे सुरू केले आहे.  

वाहतूक नियम भंग करून कोणी वाहने चालवत असतील तर त्यांची माहिती घेतली जाणार आहे.जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांनी आज दिली. येत्या वर्षभरात ही प्रक्रिया पूर्ण होणार असून वाहतुक,पोलिस आणि आरोग्य केंद्रांमध्ये याचे नियंत्रण कक्ष असणार असल्याची माहिती ढवळीकर यांनी दिली.येत्या 6 महिन्यात टॅक्सीना डिजिटल मीटर बसवण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे सांगून ढवळीकर म्हणाले,लवकरच आणखी 2 इंटरसेप्टर वाहने घेतली जाणार आहेत.

यापुढे घरी बसून ऑनलाइन पद्धतीने वाहन चालविण्यास  शिकण्याचा परवाना घेण्यासाठी परीक्षा देता येणार आहे.पाटो येथे सुसज्ज वाहतूक भवन उभरण्याला मंजूरी मिळाली असून त्याची प्रक्रिया सुरु असल्याचे वाहतूक मंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: CCTV on all roads of Goa esakal news