पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन ; 2 जवान हुतात्मा

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 एप्रिल 2018

सुंदरबनी सेक्टरजवळील भारतीय चौक्यांना पाकिस्तानी सैन्याने लक्ष्य केले होते. मंगळवारी पहाटे सव्वा पाचच्या सुमारास हा गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानच्या या कारवाईला भारतीय लष्करानेही सडेतोड प्रत्युत्तर दिले. शस्त्रसंधीदरम्यान हल्ल्यासाठी पाकिस्तानकडून उखळी तोफांचा वापर करण्यात आला. 

जम्मू : पाकिस्तानकडून सातत्याने सीमारेषेचे उल्लंघन करण्यात येत आहे. त्यानंतर आज (मंगळवार) पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यादरम्यान पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारतीय लष्करातील दोन जवान शहीद झाले. या गोळीबाराला भारतीय लष्करातील जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. 

सुंदरबनी सेक्टरजवळील भारतीय चौक्यांना पाकिस्तानी सैन्याने लक्ष्य केले होते. मंगळवारी पहाटे सव्वा पाचच्या सुमारास हा गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानच्या या कारवाईला भारतीय लष्करानेही सडेतोड प्रत्युत्तर दिले. शस्त्रसंधीदरम्यान हल्ल्यासाठी पाकिस्तानकडून उखळी तोफांचा वापर करण्यात आला. 

Army

या गोळीबारादरम्यान विनोद सिंह आणि जाकी शर्मा हे दोन जवान गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विनोद सिंह जम्मू आणि काश्मीरच्या अखनूर जिल्ह्यातील खेती दानापूर येथील रहिवासी असून, जाकी शर्मा हे जम्मूच्या संहैल गावचे रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. 

दरम्यान, या गोळीबारामुळे सीमारेषेवर तणाव निर्माण झाला असून, परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

Web Title: Ceasefire Pakistan Two Jawan Martyr