श्रीनगरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन; जवान हुतात्मा

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 जुलै 2019

लष्कराकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले असून, पाकिस्तानचे दोन सैनिक ठार झाले. मात्र, यामध्ये भारतीय लष्करातील जवान हुतात्मा झाला. 

श्रीनगर : सुंदरबनी क्षेत्रात पाकिस्तानी सैन्याकडून नियंत्रण रेषेजवळ शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. पाकिस्तानच्या सैन्याकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराला लष्कराकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले असून, पाकिस्तानचे दोन सैनिक ठार झाले. मात्र, यामध्ये भारतीय लष्करातील जवान हुतात्मा झाला. 

पाकिस्तानी सैन्याकडून नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. सुंदरबनी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गोळीबार केला. या गोळाबारात भारताच्या एका जवानाला वीरमरण आले. सुंदरबनी क्षेत्रासह तंगधर आणि केरन विभागातही पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार करण्यात आला. 

दरम्यान, भारतीय लष्कराने प्रत्युत्तरादरम्यान केलेल्या गोळीबारात पाकिस्तान सैन्याचे दोन सैनिक ठार झाले आहेत, अशी माहिती लष्करातील सूत्रांकडून देण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ceasefire in Srinagar one Soldier Martyr