पीओकेमध्ये भारतीय लष्कराकडून तोफांचा मारा; पाच पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा

टीम ई-सकाळ
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

कुपवाडा (जम्मू-काश्मीर) : भारत-पाकिस्तान प्रत्यक्ष ताबारेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचा भंग केल्यानंतर भारतीय जवानांनी पाकला चोख प्रत्युत्तर दिले आहे. यात पाकिस्तानी चौकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले झाले आहे. या संदर्भात भारतीय लष्कराकडून माहिती देण्यात आली आहे

कुपवाडा (जम्मू-काश्मीर) : भारत-पाकिस्तान प्रत्यक्ष ताबारेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचा भंग केल्यानंतर भारतीय जवानांनी पाकला चोख प्रत्युत्तर दिले आहे. यात पाकिस्तानी चौकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले झाले आहे. या संदर्भात भारतीय लष्कराकडून माहिती देण्यात आली आहे. या हल्ल्यात 4-5 पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याची महिती आहे. तसेच अनेक पाक सैनिक गंभीर जखमी झाल्याचीही माहिती आहे.

पाकिस्तानी सैनिकांनी प्रत्यक्ष ताबारेषेवर शस्त्रसंधीचा भंग केला. त्यात नागरीवस्तीला लक्ष्य करण्यात आलं. त्यात एक नागरीक आणि दोन जवान हुतात्मा झाले. त्यानंतर भारतीय जवानांनी या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले. ताबारेषेवरून दहशतवाद्यांना भारतात घुसवण्यासाठी या हल्ल्याचा डाव होता, असे लष्कराकडून सांगण्यात आले. पाक व्याप्त काश्मीरमधील तनघर सेक्टरमधील दहशतवादी तळांना भारतीय जवानांनी लक्ष्य केले आहे. व्याप्त काश्मीरमधील नील खोऱ्यात दहशतवादी भारतात घुसवण्यासाठी चार तळ उभारण्यात आले आहेत. त्या तळांवर भारतीय जवानांनी हल्ला केला.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ceasefire violation by pakistan on loc indian army destroyed terror camps