काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 10 December 2020

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी प्रत्यक्ष भेटीऐवजी सोशल मीडियावर शुभेच्छा देत अभीष्टचिंतन केले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सोनिया गांधींना शुभेच्छा दिल्या. 

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा वाढदिवस आज साधेपणाने साजरा झाला. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी प्रत्यक्ष भेटीऐवजी सोशल मीडियावर शुभेच्छा देत अभीष्टचिंतन केले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सोनिया गांधींना शुभेच्छा दिल्या. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रकृती अस्वास्थ्यामुळे विश्रांतीसाठी गोव्यात गेलेल्या सोनिया गांधी वाढदिवसाआधी दिल्लीत परतल्या असल्या तरी, शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत साधेपणाने वाढदिवस साजरा करण्याचे आवाहन काँग्रेसने केले होते. संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी याबाबतच्या सूचना पक्षाचे पदाधिकारी आणि राज्य शाखांना दिल्या होत्या. त्यापार्श्वभूमीवर कोणत्याही कार्यक्रमांविनाच सोनिया गांधींचा वाढदिवस आज झाला. तर, कोरोनाच्या उपद्रवाच्या पार्श्वभूमीवर शुभेच्छुकांना भेटण्याचेही सोनियांनी टाळल्यामुळे ‘१० जनपथ’ या त्यांच्या निवासस्थानी आज शांतता होती. 

मोदी सरकारलाच घ्यावी लागेल माघार, शेतकरी हटणार नाहीत- राहुल गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विटद्वारे सोनिया गांधींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी अभीष्टचिंतन केले. काँग्रेसशासीत राज्यांचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग, अशोक गेहलोत, व्ही. नारायण स्वामी, भूपेश बघेल यांच्यासह, कार्यकारिणी सदस्य, सरचिटणीस, पदाधिकारी, वरिष्ठ नेते तसेच कार्यकर्त्यांनी ‘ट्विट’ करून सोनिया गांधींना शुभेच्छा दिल्या. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: celebration of Congress President Sonia Gandhi birthday