केंद्राने शेतकऱ्यांना दिलेले आश्‍वासन पूर्ण केले नाही

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 मे 2018

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलेले आश्‍वासन केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारने पूर्ण केले नसल्याची टीका आज राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष अजित सिंह यांनी केली आहे.

मुजफ्फरनगर-  ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलेले आश्‍वासन केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारने पूर्ण केले नसल्याची टीका आज राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष अजित सिंह यांनी केली आहे.

केंद्र सरकारने आश्‍वासन देऊनही ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी साखर कारखान्यांकडून अद्याप कोणतीही रक्कम मिळालेली नाही, असे सिंह यांनी सिसोली येथे काल शेतकरी नेते महेंद्र सिंह टिकैत यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय किसान संघाच्या मुख्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात सांगितले.

भाजप सरकारने प्रत्येक 14 दिवसांनंतर रक्कम देण्याचे आश्‍वासन दिले होते, याचीही त्यांनी आठवण करून दिली. केंद्राच्या ऊस आयात धोरणावरही त्यांनी टीका केली. यामुळे शेतकऱ्यांचा ऊस घेतला जात नाही. येथील शेती उसाने भरली आहे; मात्र केंद्र सरकार तो खरेदी करीत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना अन्य पिके घेता येत नाहीत, असे सिंह म्हणाले. 

Web Title: The Center has not fulfilled the assurances given to the farmers says ajit sinha