केंद्राने आपली भूमिका जगाला पटवून द्यावी : चिदंबरम

पीटीआय
मंगळवार, 5 मार्च 2019

चेन्नई (पीटीआय) : विरोधकांना धोपटण्याऐवजी, भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात जाऊन केलेल्या कारवाईसंदर्भात आपली भूमिका जगाला पटवून देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, असा सल्ला आज कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केंद्राला दिला. "देशाचा नागरिक या नात्याने सरकारवर माझा पूर्ण विश्वास आहे. मात्र, जगाने आपल्या भूमिकेवर विश्वास ठेवावा, असे वाटत असले, तर त्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत,'' असे चिदंबरम म्हणाले. 

हवाई दलाने पाकिस्तानात जाऊन केलेल्या कारवाईचे सर्वांत प्रथम कौतुक करणाऱ्यांमध्ये कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा समावेश होता, याची आठवण करून देत चिदंबरम यांनी ट्‌विटच्या माध्यमातून सरकारला सल्ला दिला आहे. ""देशप्रेमी नागरिक या नात्याने सरकारवर माझा पूर्ण विश्वास आहे. मात्र, जगाला आपली भूमिका विशद करून सांगण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत,'' असे चिदंबरम म्हणाले. 

पाकिस्तानात जाऊन करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांबाबत विरोधकांकडून शंका घेतली जात आहे, असे टीकास्त्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी डागले होते. त्यानंतर मोदी यांच्या वक्तव्याचा समाचार घेत कॉंग्रेससह इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सरकारच्या भूमिकेवर आज टीकेची झोड उठवली. 

गोयल यांचे प्रत्युत्तर 
चिदंबरम यांच्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या दुष्प्रचारावर कॉंग्रेसचा विश्वास आहे, मात्र त्यांचा स्वतःच्या देशातील सरकारवर विश्वास नाही, असा हल्लाबोल गोयल यांनी केला. 

Web Title: Center should convince its role Chidambaram