'सीबीएसई'चा दहावीचा निकाल जाहीर

वृत्तसंस्था
मंगळवार, 29 मे 2018

पहिल्या क्रमांकावर 500 पैकी 499 गुण घेऊन चार मुले उत्तीर्ण झाली आहेत. त्यामध्ये डीपीएस गुडगांव शाळेचा प्रकाश मित्तल, आर पी पब्लिक स्कूल, बिजनोरचा रिमझिम अग्रवाल, स्कॉटिश इंटरनॅशनल स्कूल, शामलीची नंदिनी गार्ग, भवन्स विद्यालय, कोचीनची श्रीलक्ष्मी हिचा समावेश आहे.

नवी दिल्ली - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. निकाल चार वाजता जाहीर होणार आहे असे अनिल स्वरूप यांनी सांगितले होते. परंतु, हा निकाल 2 वाजताच जाहीर करण्यात आला. 

या निकालामध्ये पहिल्या क्रमांकावर 500 पैकी 499 गुण घेऊन चार मुले उत्तीर्ण झाली आहेत. त्यामध्ये डीपीएस गुडगांव शाळेचा प्रकाश मित्तल, आर पी पब्लिक स्कूल, बिजनोरचा रिमझिम अग्रवाल, स्कॉटिश इंटरनॅशनल स्कूल, शामलीची नंदिनी गार्ग, भवन्स विद्यालय, कोचीनची श्रीलक्ष्मी हिचा समावेश आहे.

क्षेत्रानुसार पाहिल्यास चेन्नई, तिरुअनंतपुरम आणि अजमेर ही यामध्ये पहिल्या तीन क्रमांकावर आहेत. तिरुअनंतपुरमचा निकाल ९९.६० टक्क्यांसोबत पहिल्या क्रमांकावर आहे, चेन्नई ९७.३७ दुसऱ्या तर अजमेर ९१.८६ टक्क्यांसोबत तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

सीबीएसई दहावी बोर्ड परिक्षेसाठी १६ लाख २४ हजार ६८२ विद्यार्थी बसले होते. यामधील १४ लाख ८ हजार ५९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. "सीबीएसई'च्या (cbseresults.nic.in) किंवा (cbse.nic.in) या संकेतस्थळावर हा निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Web Title: Central Board of Secondary Education (CBSE) Class 10th results have been announced.