'या' आमदाराचे नागरिकत्व झाले रद्द!

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

रमेश यांनी 1993 मध्ये जर्मनीचे नागरिकत्व घेतले होते, पण 2009 मध्ये त्यांनी पुन्हा भारतीय नागरिकत्व घेतले.

नवी दिल्ली : तेलंगणा राष्ट्र समितीचे (टीआरएस) आमदार चेन्नामनेई रमेश यांचे भारतीय नागरिकत्व केंद्रीय गृह मंत्रालयाने रद्द केले आहे. या संबंधीचा नवा आदेश गुरुवारी (ता.21) काढण्यात आला. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

रमेश यांनी 1993 मध्ये जर्मनीचे नागरिकत्व घेतले होते, पण 2009 मध्ये त्यांनी पुन्हा भारतीय नागरिकत्व घेतले. मात्र, त्या वेळी त्यांनी नियमांचे पालन केले नसल्याचे सांगत गृह मंत्रालयाने नागरिकत्व रद्द केले होते.

- इथे चक्क म्हशींसाठी मागितली जातेय खंडणी!

त्या विरोधात रमेश हे 2017 मध्ये तेलंगणा उच्च न्यायालयात गेले होते. त्यांची सुनावणी नव्याने घेण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. त्यानंतर गृह मंत्रालयाने त्यांचे नागरिकत्व रद्द केल्याचा आदेश गुरुवारी पुन्हा काढला.

- अवघ्या 35 मिनिटांत फुल चार्ज होणार 'रिअलमीचा एक्स 2 प्रो'

विधानसभा निवडणुकीत 2009 मध्ये ते तेलुगू देशम पक्षाकडून (टीडीपी) निवडून आले होते. सध्या रमेश 'टीआरएस'चे आमदार आहेत. गृह मंत्रालयाच्या या आदेशाला तेलंगण उच्च न्यायालयात पुन्हा आव्हान देणार असल्याचे रमेश यांनी सांगितले.

- खूशखबर ! इथं आहेत 1 लाख नोकरीच्या संधी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Central Government cancels citizenship of TRS MLA Chennamaneni Ramesh from Telangana