तीन कोटी विद्यार्थ्यांच्या सोशल मीडियावर केंद्र सरकारचे लक्ष

वृत्तसंस्था
रविवार, 7 जुलै 2019

नवी दिल्ली : महाविद्यालयातील तब्बल 03 कोटी विद्यार्थ्यांच्या सोशल मिडीयाच्या अकाऊंटवर केंद्र सरकार नजर ठेवुन आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार हा दावा करण्यात आला आहे. रिपोर्टमधील माहितीनुसार, या विद्यार्थ्यांशी सोशल मिडीयावर संबंध ठेवुन त्यांच्या आणि संस्थेच्या चांगल्या कामाची माहिती प्रसारित करण्याची केंद्र सरकारची इच्छा आहे.

सरकारच्या या उपक्रमावर काही शिक्षण तज्ञांनकडून चिंता व्यक्‍त केली जात आहे. शिक्षण क्षेत्रातील या जाणकारांना सरकारच्या या उपक्रमाबाबत भलतच काहीतरी वाटत असुन त्यांना विद्यार्थ्यांच्या सोशल मिडीयाच्या अकाऊंटवरून घेण्यात येणार्‍या माहितीचा दुरूपयोग करून त्यांची विचारधारा जाणून घेतल्यानंतर त्यांना फॅकल्टी इंटरव्यूच्या वेळी गाळले जाईल अशी शंका आहे.

विश्‍वविद्यालयातील एका प्राध्यापकाने दिलेल्या माहितीनुसार, एका विद्यार्थ्याला त्याच्या फॅकल्टी इंटरव्यूच्यानंतर रिजेक्ट करण्यात आले होते. संबंधित विद्यार्थ्याच्या सोशल मिडीयाच्या अकाऊंटवर सरकार विरोधी कमेंट होत्या म्हणून असे करण्यात आल्याची शंका देखील उपस्थित करण्यात आली आहे.

प्रत्येक संस्थेत मिडीया चॅम्पीयनची नियुक्‍ती –
प्रत्येक संस्था त्यांच्याकडून एकाची नेमणुक मिडीया चॅम्पीयन अथवा एसएससी म्हणून करू शकते. नेमणुक करण्यात आलेला मिडीया चॅम्पीयन अथवा एसएससी मानव संसाधन मंत्रालयाच्या संपर्कात राहून विद्यार्थ्यांच्या आणि संस्थेच्या चांगल्या कामांना जास्तीत जास्त शेअर करेल. मिडीया चॅम्पीयन अथवा एसएससी यांनी नेमकं काय करावे हे देखील सचिवांनी पत्र देऊन सांगण्यात आले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: central government connect itself with university colleges more then 3 crore students via social media concern raises