Old Pension Scheme : मोदी सरकारचा मोठा निर्णय! 'या' कर्मचाऱ्यांना मिळणार जुन्या पेन्शन योजनेचा लाभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pension Scheme

Old Pension Scheme : मोदी सरकारचा मोठा निर्णय! 'या' कर्मचाऱ्यांना मिळणार जुन्या पेन्शन योजनेचा लाभ

Old Pension Scheme Latest Update : केंद्रातल्या मोदी सरकारने मोठ्या प्रतीक्षेनंतर खूशखबरी दिली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना म्हणजेच Old Pension Scheme चा लाभ मिळणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा निर्णय समजला जात आहे.

वस्तूतः जुनी पेन्शन योजनेचा लाभ सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार नाही. कारण सरकारच्या वतीने जारी करण्यात आलेल्या नवीन अपडेटनुसार काही निवडक कर्मचाऱ्यांनाच ओल्ड पेन्शन स्कीमचा (OPS) फायदा मिळणार आहे. नेमके कोणते केंद्रीय कर्मचारी या योजनेचा लाभ घेऊ शकतात, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.

२२ डिसेंबर २००३ च्या पूर्वीचे केंद्रीय कर्मचारी सिव्हिल सेवा (पेन्शन) नियम, १९७२ (आता २०२१) नुसार जुन्या पेन्शन योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत. म्हणजे २२ डिसेंबर २००३ च्यापूर्वी झालेल्या भरती प्रक्रियेमध्ये सरकारी नोकरींमध्ये निवडलेल्या कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे. तर २२ डिसेंबर २००३ नंतर झालेल्या भरतीमध्ये नोकरी मिळवलेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ मिळणार नाही. त्यांना राष्ट्रीय पेन्शन योजनेंतर्गत कव्हर दिलं जाईल.

जे सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत ते ३१ ऑगस्ट २०२३पर्यंत पर्याय निवडू शकतात. जे कर्मचारी जुनी पेन्शन योजनेचा पर्याय निवडणार नाही त्यांना नवीन पेन्शन योजनेनुसार लाभ मिळेल, असं सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेलं आहे.

जुन्या पेन्शन अंतर्गत दरमहा ठराविक रक्कम मिळते

जुन्या पेन्शन अंतर्गत कर्मचाऱ्यांना ठराविक रक्कम पेन्शन म्हणून दिली जाते. एखाद्या कर्मचाऱ्याला त्याच्या शेवटच्या पगाराच्या 50 टक्के पेन्शन म्हणून मिळण्याचा अधिकार आहे. एनडीए सरकारने 1 एप्रिल 2004 पासून ओपीएस बंद करण्याचा निर्णय घेतला होता.