BSNL : ‘बीएसएनएल’ला केंद्राचा ‘बूस्टर’; फोर-जी, फाईव्ह-जी स्पेक्ट्रमलाही मंजुरी

सरकारने २०१९ मध्ये बीएसएनएल व एमटीएनएलसाठी ६९,००० कोटी रुपयांचे पहिले पुनरुज्जीवन पॅकेज मंजूर केले
BSNL
BSNL sakal

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज ‘बीएसएनएल’च्या पुनरुज्जीवन धोरणाचा एक भाग म्हणून त्यांच्यासाठी ८९,०४७ कोटी रुपयांच्या तिसऱ्या पुनरुज्जीवन पॅकेजला मंजुरी दिली. यात ‘बीएसएनएल’ ला भांडवल उभारणीद्वारे फोर-जी, फाईव्ह-जी स्पेक्ट्रम वाटपाचाही समावेश आहे.

या निर्णयामुळे ‘बीएसएनएल’च्या भांडवलामध्ये दीड लाख कोटी रुपयांवरून दोन लाख दहा हजार कोटी रुपयांपर्यंत वाढ होईल. तसेच यामुळे ‘बीएसएनएल’ हा भारतातील दुर्गम भागांना कनेक्टिव्हिटी देणारा दूरसंचार सेवा पुरवठादार म्हणून काम करू शकेल. 

सरकारने २०१९ मध्ये बीएसएनएल व एमटीएनएलसाठी ६९,००० कोटी रुपयांचे पहिले पुनरुज्जीवन पॅकेज मंजूर केले होते. तर २०२२ मध्ये बीएसएनएल, एमटीएनएलसाठी १.६४ लाख कोटी रुपयांचे दुसरे पुनरुज्जीवन पॅकेज मंजूर केले.

BSNL
BSNL 5G : एअरटेल, जिओला BSNL देणार टक्कर; 5G बाबत केंद्रीय मंत्र्यांचं महत्त्वाचं विधान

त्याने भांडवली खर्चाला निधी, ग्रामीण भागातील लँडलाइनसाठी व्यवहार्यता तफावत निधी, एजीआर थकबाकीची पूर्तता, ‘बीबीएनएल’चे ‘बीएसएनएल’मध्ये विलीनीकरण, इत्यादींसाठी अर्थसहाय्य मिळाले.

या दोन पॅकेजमुळे, आर्थिक वर्ष २०२१-२२ पासून बीएसएनएल ला कामचलाऊ नफा मिळू लागला. बीएसएनएल चे एकूण कर्जही ३२,९४४ कोटी रुपयांवरून २२,२८९ कोटी रुपये इतके कमी झाले.

BSNL
BSNL Revival: BSNL करणार अंबानींच्या Jio शी स्पर्धा? चक्क मोदींनी दिला ग्रीन सिग्नल

‘बीएसएनएल’ने देशभरात फायबर नेटवर्कच्या जाळ्यात (होम फायबर) मोठी वाढ नोंदवली असून, दर महिन्याला एक लाखांहून अधिक नवीन जोडण्या दिल्या जात आहेत. मे २०२३ मधील ‘बीएसएनएल’ची एकूण होम फायबर ग्राहक संख्या ३०.८८ लाख इतकी आहे. गेल्या वर्षी त्यांना होम फायबरमधून एकूण २,०७१ कोटी रुपये महसूल मिळाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com