केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना कोरोनाची लागण

टीम ई-सकाळ
रविवार, 2 ऑगस्ट 2020

स्वतः अमित शहा यांनी ट्विट करून ही माहिती दिली. 

नवी दिल्ली : देशभरात कोरोना व्हायरसचा फैलाव अतिशय वेगानं होत असताना आता, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वतः अमित शहा यांनी ट्विट करून ही माहिती दिली.

काय म्हणाले अमित शहा?
अमित शहा यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, कोरोनाची प्राथमिक लक्षण दिसू लागल्यानंतर मी टेस्ट केली होती आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहे. माझी विनंती आहे की, तुमच्या पैकी जे कोणी गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आले होते. त्यांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी ही विनंती.

दरम्यान, रविवारी देशात पुन्हा कोरोनाचे रुग्ण 50 हजारांच्यावर सापडले आहेत. गेल्या 24 तासांत 54 हजार 735 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. देशात सध्या कोरोना रुग्णांची आतापर्यंतची संख्या 17 लाख 50 हजार 723 झाली आहे. यातील 11 लाख 45 हजार जण कोरोनातून मुक्त झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासांत 823 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. त्यामुळं देशातील एकूण मृतांची संख्या आता 37 हजार 364वर गेली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: central home minister amit shah got covid19 positive

टॅग्स
टॉपिकस