उत्तरप्रदेशात भाजपला मोठा धक्का?; केंद्रीय मंत्री प्रियंका गांधीच्या भेटीला

उत्तरप्रदेशात भाजपला मोठा धक्का?; केंद्रीय मंत्री प्रियंका गांधीच्या भेटीला

लोकसभा 2019 ः लखनौ ः उत्तर प्रदेशात भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री आणि अपना दलच्या नेत्या अनुप्रिया पटेल यांनी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांची भेट घेतली आहे. अपना दल हा उत्तरप्रेदशातील भाजपचा मित्रपक्ष असून तो एनडीएतून बाहेर पडण्याच्या विचारात असल्याचं चित्र आहे.

'अपना दल'च्या अनुप्रिया पटेल यांनी प्रियांका गांधी यांच्या भेटीदरम्यान आघाडी करण्याबाबत चर्चा केल्याची माहिती आहे. या बैठकीला काँग्रेसचे पश्चिम युपीचे प्रभारी ज्योतिरादित्य सिंधिया हेदेखील उपस्थित होते. अनुप्रिया पटेल यांच्या अपना दल या पक्षाने मागील निवडणुकीत भाजपसोबत युती केली होती. तेव्हा भाजपने त्यांना लोकसभेच्या सात जागा सोडल्या होत्या. या पक्षाचे दोन खासदार आहेत. तर पूर्व उत्तर प्रदेशच्या 10 ते 12 जागांवर या पक्षाचा चांगला प्रभाव आहे. त्यामुळे हा पक्ष एनडीएतून बाहेर पडल्यास या भागात भाजपची डोकेदुखी वाढू शकते.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक उलटफेर होत असताना अपना दल काँग्रेससोबत आल्यावर याचा काँग्रेसला कीती फायदा होईल आणि भाजपला कीती तोटा होईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com