esakal | 'पापड खा' म्हणणारे, भाजपचे मंत्री आता कोरोना पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

central minister arjun ram meghwal tested covid 19 positive papad statement

कोरोनानं जगभरात अक्षरशः थैमान घातलंय. जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनावर कायमस्वरूपी लस शोधण्याचा प्रयत्न करत असून, दिवस रात्र एक करत आहेत.

'पापड खा' म्हणणारे, भाजपचे मंत्री आता कोरोना पॉझिटिव्ह

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : कोरोनाला रोखण्यासाठी भाभीजी पापड खा आणि कोरोना (Coronavirus) मुक्त व्हा, असा अजब सल्ला देऊन केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल (arjun ram meghwal) चर्चेत आले होते. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडिओमुळं ते ट्रोलही झाले होते. आता स्वतः अर्जुन राम मेघवाल यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचं जाहीर केलंय. 

आणखी वाचा -  अयोध्येत रोज किती भाविक दर्शनासाठी येणार?

काय म्हणाले होते मेघवाल?
कोरोनानं जगभरात अक्षरशः थैमान घातलंय. जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनावर कायमस्वरूपी लस (Covid Vaccine) शोधण्याचा प्रयत्न करत असून, दिवस रात्र एक करत आहेत. जगभरातील शास्त्रत्र, असा प्रयत्न करत असताना, केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी कोरोना रोखण्यासाठी पापड खाण्याचा सल्ला देऊन नवा वाद ओढवून घेतला होता. भाभीजी पापड खाल्ल्यानंतर कोरोनाशी लढण्यासाठीची ताकद (अँटिबॉडिज्) तयार होईल, असा दावा अर्जुन मेघवाल यांनी केला होता. एका केंद्रीय मंत्र्याने असा सामान्यांची दिशाभूल करणारा दावा केल्यामुळं त्यांच्यावर सोशल मीडियावरून खूप टीका झाली होती. आता स्वतः अर्जुन राम मेघवाल कोरोनाग्रस्त झाले आहेत. याबाबत त्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. 

आणखी वाचा - राजस्थानच्या राजकीय नाट्याला वेगळं वळण; भाजपचे आमदार गुजरातमध्ये दाखल