जवानांच्या तक्रारीसाठी लवकरच मोबाईल ऍप!

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 जानेवारी 2017

नवी दिल्ली- लष्करातील जवानांनी सोशल नेटवर्किंगवर व्हिडिओ अपलोड करून खळबळ उडवून दिल्यानंतर जवानांच्या तक्रारीसाठी केंद्र सरकार लवकरच मोबाईल ऍप तयार करणार आहे, अशी माहिती लष्करी अधिकाऱयांनी आज (मंगळवार) दिली.

लष्करातील जवानांनी व्हिडिओ तयार करून सोशल नेटवर्किंगवर अपलोड केले होते. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाल्यानंतर सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. शिवाय, दिल्ली उच्च न्यायालयाने जवानांना मिळणाऱया अन्नाच्या दर्जाबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

जवानांनी एकापाठोपाठ एक व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर अपलोड केल्यानंतर लष्कराने कामाच्या वेळेत मोबाईल वापरावर बंदी घातली आहे. परंतु, लष्करातील जवानांना तक्रारी नोंदविण्यासाठी ऍप तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय गृह सचिव राजीव मेहरशी यांनी दिली. पुढील तीन महिन्यांमध्ये ऍप तयार होईल, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सांगितले.

या ऍपच्या माध्यमांतून जवान त्यांच्या तक्रारी वरिष्ठांपर्यंत पोहचवू शकतील. शिवाय, यामध्ये पारदर्शकता असणार आहे.

Web Title: Centre plans to develop app for forces to air grievances