काँग्रेसमुळेच आज चहावाला पंतप्रधान - खरगे

वृत्तसंस्था
सोमवार, 9 जुलै 2018

काँग्रेसचे नवीन महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी काल (रविवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे आहे. ते म्हणाले की, ' देशात आजपर्यंत काँग्रेसने लोकशाहीचं संरक्षण केले आहे आणि त्या लोकशाहीच्या जीवावरच या देशात एक चहावाला पंतप्रधान झाला आहे, 'अशी टीका खरगे यांनी केली आहे. 

मुंबई: काँग्रेसचे नवीन महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी काल (रविवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे आहे. ते म्हणाले की, ' देशात आजपर्यंत काँग्रेसने लोकशाहीचं संरक्षण केले आहे आणि त्या लोकशाहीच्या जीवावरच या देशात एक चहावाला पंतप्रधान झाला आहे, 'अशी टीका खरगे यांनी केली आहे. 

मुंबईमध्ये काँग्रेसने आयोजित केलेल्या एका मेळाव्यात ते बोलत होते, त्यावेळी मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवर टीका केली. ' नेहमी काँग्रेसने 60 वर्षात काय केलं? असा प्रश्न मोदीजी प्रत्येक ठिकाणी विचारत असतात. आज मोदीजी काँग्रेसने लोकशाही टिकवून ठेवली म्हणूनच पंतप्रधान आहेत हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे असे खरगे म्हणाले.

'भाजपकडून गांधी घराण्यावर विनाकराण टीका केली जाते, इंदिरा गांधी यांच्यावर टीका करताना आणीबाणीचा उल्लेख केला जातो. परंतु, देशात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून अघोषित आणीबाणीच चालू असल्याचा आरोप खरगे यांनी केला.

Web Title: Chaiwala Is PM Because Congress Preserved Democracy says Mallikarjun Kharge