चाकण-शिक्रापूर रस्ता बनलाय मृत्युचा सापळा

विवेक बच्चे : सकाळ संवाद
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

'सकाळ संवाद' ऍपद्वारे विवेक बच्चे यांनी पाठविलेली बातमी

चाकण - अलिकडेच चाकण-शिक्रापुर रस्त्यावर हनुमंत ठाकर वय (36 वर्षे), त्यांची पत्नी सिंधू ठाकर (वय 30 वर्षे), त्यांचा मुलगा सचिन ठाकर (वय 11 वर्षे) या तिघांचा भोसे येथील जिल्हा परिषद शाळेसमोरील गतीरोधकावर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने मृत्यु झाला.

चाकण-शिक्रापुर रस्त्यावर एकूण 17 ठिकाणी गतीरोधक बनवीलेले आहे. या गतिरोधकांपैकी बहुतांश गतिरोधकावर अनेक वेळा अपघात झाल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. खरे तर बीओटी तत्वावर हा रस्ता बांधल्यावर वेळ आणि इंधन वाचेल आणि सुरक्षित प्रवास होईल अशी अपेक्षा होती. परंतु बहुतांश ठिकाणी गतीरोधकावर पांढरे पट्टे नाहीत,रात्रीच्या वेळी गतिरोधक लक्षात यावे म्हणून रिफ्लेक्‍टर नाहीत,सुचना फलक नाहीत.अनेक वाहने अतीवेगाने जात असल्याने गतीरोधकांवर ब्रेक लावत नाहीत,त्यामुळे या रस्त्यानवरून रात्री प्रवास करणे म्हणजे जणू मृत्युला आमंत्रण देण्यासारखेच आहे.या रस्त्याने प्रवास करणाऱ्या लोकांना या गतीरोधकांवर गाड़ी आपटुन पाठदुखी, मानदुखी अशा अनेक आजारांचा सामना करण्याची वेळ आली आहे,साबळेवाडी या ठिकाणी तर यासाठी रास्ता रोको ही केले गेले होते,अनेकवेळा रस्ता चौपदरीकरण करावी अशी मागणी करूनही प्रशासन जाणूनबुजुन या मागणीकडे जाणूनबुजुन दुर्लक्ष करीत आहे.वेळीच या ठिकाणचा गतिरोधक काढला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा भोसे गावचे स्थानिक ग्रामस्थ आणि माजी सरपंच गणेश चव्हाण,मुकुंद जाधव,माजी ग्रा.स.नवनाथ गांडेकर यांनी दिला.

Web Title: Chakan-Shikrapur accidental road