डेरा परिसरातून आणखी एक मुलगी बेपत्ता

वृत्तसंस्था
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

चंडीगड: सिरसा येथे डेरा सच्चा सौदा परिसरातून मुलगी गायब होण्याचे प्रकार सुरूच असून, हरियानाची एक मुलगी डेराच्या आश्रमातून बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. गुरमीत राम रहीमला बलात्कारप्रकरणी दोषी ठरविल्यानंतर ती मुलगी डेरातून गायब असल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे.

श्रद्धा नावाची मुलगी डेरा सच्चा सौदा येथे शिक्षण घेत होती. हरियानाच्या तिवाला येथील तिच्या कुटुंबाने 2008 पासून श्रद्धाच्या संपर्कात नसल्याचे म्हटले आहे. तिचे नातेवाईक परमिंदर सिंह हे आपल्या गावकऱ्यांच्या मदतीने सिरसामध्ये तिचा शोध घेत आहेत. डेराच्या वतीने प्रसिद्ध होणाऱ्या एका नियतकालिकेत तिचा उल्लेख योगाभ्यास करणारी विद्यार्थिनी म्हणून करण्यात आला होता. हीच तिची शेवटची ओळख होती आणि त्यानंतर तिचा थांगपत्ता लागलेला नाही.

गुरमीत राम रहीमला दोषी ठरविल्यानंतर श्रद्धा डेरा सोडून गेल्याचे तिच्या नातेवाइकांना सांगण्यात आले. 2008 मध्ये श्रद्धाच्या नातेवाइकांनी भेटण्याचा प्रयत्न केला, परंतु डेराच्या कर्मचाऱ्यांनी भेटू दिले नाही. तसेच डेराच्या पदाधिकाऱ्यांमार्फत मोबाईलवर तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र काहीच उपयोग झाला नाही. डेराच्या परिसरात संचारबंदी लागू असून आतमध्ये जाणेदेखील कठीण आहे. डेराच्या मार्फत सुरू असलेल्या अल्पवयीन मुलींच्या वसतिगृहात सुमारे 29 मुली शिकत होत्या.

Web Title: chandigarh news Another girl missing from Dera's area