आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीची छेड: भाजप प्रदेशाध्यक्षाच्या चिरंजीवास अटक

वृत्तसंस्था
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

चंडीगड: आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीशी छेडछाड केल्याप्रकरणी हरियाना भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांचे चिरंजीव, मुख्य आरोपी विकास बराला याला आज पोलिसांनी अटक केली. विकास आणि त्याचा मित्र आशिष यांच्याशी पोलिसांनी चर्चा केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध अपहरणाचा प्रयत्न केल्याचाही गुन्हा दाखल केला आहे.

विकास बराला आणि त्याच्या साथीदारास उद्या गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अटक होण्यापूर्वी कडक सुरक्षाव्यवस्थेत या प्रकरणाच्या चौकशीसाठी दोघे हजर झाले होते. तत्पूर्वी चंडीगड पोलिसांनी सनदी अधिकाऱ्याच्या मुलीचा पाठलाग केल्याप्रकरणी काल विकास बरालाविरुद्ध समन्स बजावले होते. सुभाष बराला यांच्या सेक्‍टर सातमध्ये असलेल्या निवासस्थानी प्रवेशद्वारावर पोलिसांनी नोटीस चिकटवली होती. कारण नोटीस घेण्यासाठी घरात कोणीही नव्हते, असे पोलिसांनी सांगितले. मात्र, बराला कुटुंबीयांचे नातेवाईक असलेल्या कृष्णनने नोटीस घेतली होती.

प्रकरण काय
गेल्या आठवड्यात शुक्रवारी रात्री 11 ते 12च्या सुमारास त्या अधिकाऱ्याची मुलगी मोटारीतून जात होती. या वेळी दुसऱ्या मोटरीने दोन मुलांनी तिचा पाठलाग केला. त्यानंतर दोघांनी मोटार आडवी करून तिची गाडी थांबवली आणि मोटारीतून तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी मुलीने तात्काळ पोलिसांना फोन केला. त्यानुसार पोलिस घटनास्थळी पोचताच दोघा आरोपींना अटक केली. मात्र, त्यानंतर जामिनावर सोडून देण्यात आले. पोलिस सूत्रानुसार आरोपी नशेत होते.

Web Title: chandigarh news bjp vikas barala areested