मासिकातील जाहिरातीतून मागास विचारांचे दर्शन

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 जून 2017

विरोधकांची हरियाना सरकारवर टीका

चंडिगड: हरियाना सरकारने प्रसिद्ध केलेल्या मासिकातील जाहिरातीमधील छायाचित्राच्या ओळींवरून वाद निर्माण झाला आहे. "घूंघट की आन-बान, म्हारे हरियाना की पहचान' (घूंघटची शान आमच्या हरियानाची ओळख), असे यात म्हटले आहे. "यावरून भाजप सरकारचे बुरसटलेले विचार दिसून येतात, अशी टीका विरोधकांनी केली आहे.

भाजपचे वरिष्ठ मंत्री अनिल विज यांनी या टीकेला उत्तर देताना, ""भाजप सरकार महिला सक्षमीकरणासाठी नवीन योजना आखत आहे, त्यामुळे घूंघट (डोक्‍यावरून पदर घेणे) घेण्याची सक्ती महिलांवर करावी, याचे समर्थन सरकार करणार नाही,'' असे म्हटले आहे. हरियाना सरकारचे मासिक "हरियाना संवाद' याचा भाग असलेल्या "कृषी संवाद' या पत्रिकेच्या ताज्या अंकात ही जाहिरात आहे. डोक्‍यावरून चारा घेऊन जाणाऱ्या महिलेने तोंडावर पदर घेतल्याचे यात दाखविले आहे. यातील ओळीमध्ये "घूंघट की आन-बान, म्हारे हरियाना की पहचान', असे म्हटले आहे. पत्रिकेच्या मुखपृष्ठावर मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचे छायाचित्र आहे.

छायाचित्रातील या ओळींवरून विरोधकांनी राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. "सत्ताधारी भाजपचे बुरसटलेले विचार यातून दिसतात', असे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुडा व कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते व पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे. हुडा म्हणाले, ""यातून सरकारचे मागास विचार लक्षात येतात. हरियानाच्या महिला सर्व क्षेत्रांत पुढे आहेत. तीन दिवसांपूर्वीच राज्यातील तरुणीने "मिस इंडिया'चा किताब जिंकला. खेळ व अन्य क्षेत्रांतही राज्यातील मुलींनी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. भारतात जन्मलेली अमेरिकी अंतराळवीर कल्पना चावला ही मूळची हरियानाची होती.''

Web Title: chandigarh news haryana government advertise