मुसळधार पावसाने चंडीगडला झोडपले

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 जुलै 2017

चंडीगड,: पंजाब, हरियानाची संयुक्त राजधानी असलेल्या चंडीगडमध्ये आज मुसळधार पावसाने हजेरी लावली. मात्र, केंद्रशासित प्रदेश असलेल्या या भागात तत्पूर्वी मॉन्सूनने हजेरी लावली होती. मात्र कालपर्यंत येथे कमी पाऊस झाला होता; परंतु आज येथे पावसाने चांगली हजेरी लावली. या मुसळधार पावसामुळे सर्व रस्ते जलमय झाले होते, त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती.

शेजारी असलेल्या पंजाबच्या मोहाली, पतियाळा आणि फतेहगड साहिब आणि हरियानाच्या पंचकुला आणि अंबाला येथेही हजेरी लावली, असे हवामान खात्याच्या सूत्रांनी सांगितले.

मॉन्सूनचे आगमन होऊनही चंडीगडमध्ये पाऊस पडत नसल्याने शेतकरी त्याची आतुरतेने वाट पाहत होता. आता आलेला पाऊस हा गेल्या काही आठवड्यातील तूट भरून काढेल, अशी अपेक्षा येथील रहिवासी अनिलकुमार यांनी व्यक्त केली.

Web Title: chandigarh news rain in chandigarh