चार दिवस 50 जणांनी केला बलात्कार; हरियानातील तरुणीचा आरोप

वृत्तसंस्था
शनिवार, 21 जुलै 2018

आपल्यावर 50 पुरुषांनी सलग चार दिवस बलात्कार केल्याची तक्रार एका 22 वर्षीय तरुणीने केली आहे. ही घटना हरियानामधील पंचकुला जिल्ह्यात मोरनी येथे घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तीन जणांना अटकही केली आहे. 

चंदीगड (हरियाना) - आपल्यावर 50 पुरुषांनी सलग चार दिवस बलात्कार केल्याची तक्रार एका 22 वर्षीय तरुणीने केली आहे. ही घटना हरियानामधील पंचकुला जिल्ह्यात मोरनी येथे घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तीन जणांना अटकही केली आहे. 

या महिलेच्या पतीने यासंबधी माहिती देताना सांगितले आहे की, त्यांच्या ओळखीच्या एका माणसाने तिला गेस्ट हाऊसमध्ये 12 रुपये पगाराची नोकरी देण्याचे अमिष दाखवले होते. त्यानंतर तिला गुंगीचे औषध देऊन तेथील 50 जणांनी तिच्यावर सलग चार दिवस बलात्कार केला. त्याचबरोबर, झालेला हा प्रकार कुठे सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. 

दरम्यान, चंदीगड येथील मनीमाजरा पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. यात या महिलेने आरोप केला आहे की, तिला चार दिवस डांबून ठेवण्यात आले होते आणि तिथे तब्बल 50 पुरुषांनी तिच्यावर बलात्कार केला.

Web Title: Chandigarh woman claims 50 men raped her