जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा गोळीबार; आरएसएसचे चंद्रकांत शर्मा जखमी

वृत्तसंस्था
मंगळवार, 9 एप्रिल 2019

- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सदस्य चंद्रकांत शर्मा गंभीर जखमी झाले असून, यामध्ये त्यांचा खासगी सुरक्षारक्षक ठार झाला आहे. 

किश्तवार : जम्मू-काश्मीरमधील किश्तवार येथे दहशतवाद्यांनी आज (मंगळवार) गोळीबार केला. या गोळीबारात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सदस्य चंद्रकांत शर्मा गंभीर जखमी झाले असून, यामध्ये त्यांचा खासगी सुरक्षारक्षक ठार झाला आहे. 

चंद्रकांत शर्मा येथील जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय सहाय्यक म्हणून काम पाहत आहेत. आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर गोळीबार करत जीवघेणा हल्ला करण्यात आला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात त्यांच्या खासगी सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला तर शर्मा हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर येथील परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली असून, परिसरात शोधमोहीम सुरु करण्यात आली आहे. 

Web Title: Chandrakant Sharma Member Of RSS Injured Attacked By Terrorists in JK