भीम आर्मीचा रावण ‘टाइम’च्या यादीमध्ये

पीटीआय
Friday, 19 February 2021

जगप्रसिद्ध ‘टाइम’ या नियतकालिकाने तयार केलेल्या जगातील शंभर प्रभावशाली व्यक्तींच्या यादीमध्ये भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण यांचा समावेश केला आहे.

नवी दिल्ली - जगप्रसिद्ध ‘टाइम’ या नियतकालिकाने तयार केलेल्या जगातील शंभर प्रभावशाली व्यक्तींच्या यादीमध्ये भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण यांचा समावेश केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतीय वंशाच्या पाच व्यक्ती या यादीमध्ये झळकल्या आहेत. भविष्याला आकार देणाऱ्या जगभरातील शंभर व्यक्तींच्या कार्याचा आढावा ‘टाइम’कडून घेण्यात आला आहे. भीम आर्मीच्या चळवळीमुळे दलितांची गरिबीच्या दुष्टचक्रातून मुक्तता होण्यास मदत झाली. दलितांना न्याय मिळावा म्हणून देखील या संघटनेने अनेक लढे उभारले, असे टाइमने म्हटले आहे. हा गौरव म्हणजे बहुजन समाजाच्या आत्मसन्मानासाठी दिलेल्या लढ्याबद्दल मिळालेले प्रशस्तीपत्र असल्याचे रावण यांनी म्हटले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या यादीत ब्रिटनमधील चॅन्सलर ऑफ दि एक्सचेकर ऋषी सुनक, ट्विटरच्या विजया गद्दे, ‘इन्स्टाकार्ट’च्या सीईओ आणि संस्थापक अपूर्वा मेहता, ‘गेट अस पीपीई’च्या कार्यकारी संचालिका डॉ.शिखा गुप्ता आणि ‘अपसॉल्व्ह’चे सहसंस्थापक रोहण पावुलूरी यांचाही या यादीमध्ये समावेश आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chandrashekhar azad Bhim Army Times list Powerful Person

Tags
टॉपिकस
Topic Tags: