Chandrayaan 2 : 'चांद्रयान 2'ने पाठवले चंद्रावरील विवराचे थ्रीडी छायाचित्र!

वृत्तसंस्था
Thursday, 14 November 2019

'टीएमसी 2'ने 5एम अवकाश बिंदूघनवरून त्रिमितीदर्शक छायाचित्रे काढली आहेत. ही सर्व छायाचित्रे 100 किलोमीटर कक्षेतून काढण्यात आल्याचे सांगण्यात आले.

बंगळूर : 'चांद्रयान 2' ने काढलेली चंद्राच्या पृष्ठभागाची त्रिमितीय छायाचित्रे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) बुधवारी (ता. 13) प्रसिद्ध केली. चांद्रयानावरील 'टेरेन मॅपिंग कॅमेरा- 2'ने (टीएमसी 2) चंद्राच्या भूभागावर असलेल्या विवराचे छायाचित्र काढले आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

'इस्रो'ने त्यांच्या अधिकृत ट्‌विटर हँडलवरून या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की चांद्रयान 2 च्या 'टीएमसी 2'ने चंद्रावरील विवराचे त्रिमितीय छायाचित्र पाहा. 'टीएमसी 2'ने 5एम अवकाश बिंदूघनवरून त्रिमितीदर्शक छायाचित्रे काढली आहेत. ही सर्व छायाचित्रे 100 किलोमीटर कक्षेतून काढण्यात आल्याचे सांगण्यात आले.

फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या गावात शरद पवार; शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा

चंद्रावर मोठ-मोठे खड्डे असल्याचे या छायाचित्रांमधून स्पष्ट दिसत असून, ते लाव्हारसाच्या भुयाराप्रमाणे दिसत आहेत. यावरून चंद्रावरील जीवसृष्टीच्या शक्‍यतेबद्दल माहिती मिळण्यास मदत होऊ शकेल. भविष्यकालीन शोधांसाठी त्याचा उपयोग शकतो, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. 

- शबरीमला प्रकरण : सात न्यायाधीशांचे खंडपीठ देणार निर्णय

विवराला भारतीय शास्त्रज्ञाचे नाव 

चांद्रयानाने चंद्राच्या पृष्ठभागावरील ज्या विवरांची छायाचित्रे पाठविली आहेत, त्यात सोमरफिल्ड, किर्कवुड, जॅक्‍सन, मच, कोरोलेव्ह, मित्रा, प्लास्केट, रोंज्देस्टेव्हेनस्की आणि हरमिट यांचा समावेश आहे.

Image may contain: 1 person, text

या विवरांची नावे महान शास्त्रज्ञ, अंतराळवीर आणि भौतिकशास्त्रज्ञांच्या नावांवरून ठेवली आहेत. मित्रा विवराचे नाव प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ प्रा. एस. कुमार मित्रा यांच्या नावावरून ठेवले आहे.

- विवाह समारंभात एके-56 आणि एम-16 रायफलसोबत वधु-वराने काढले फोटो, गुन्हा दाखल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrayaan 2 sends new 3D pictures of the crater on Moon