चांद्रयान-2 ने क्लिक केला चंद्राचा पहिला फोटो

वृत्तसंस्था
Friday, 23 August 2019

- चांद्रयान-2 ने काढला चंद्राचा पहिला फोटो
- चांद्रयान-2 चे लॅंडर विक्रम यांनी  2650 किमी उंचीवरुन हा फोटो काढला​
- चंद्रावरील अपोलो क्रेटर आणि मरे ओरिएण्टल बेसिन ही दोन ठिकाणे स्पष्ट दिसत आहेत​

नवी दिल्ली : चांद्रयान-2ने मंगळवारी (ता. 20) चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. त्यानंतर चांद्रयान-2ने काडलेला चंद्राचा पहिला फोटो भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) प्रसिद्ध केला आहे. 

चांद्रयान-2 चे लॅंडर विक्रम यांनी चंद्रापासून 2650 किमी उंचीवरुन हा फोटो काढला आहे. या फोटोमध्ये चंद्रावरील अपोलो क्रेटर आणि मरे ओरिएण्टल बेसिन ही दोन ठिकाणे स्पष्ट दिसत आहेत. 

या यानाचा कार्यकाळ एक वर्ष असून चंद्रावरील एक दिवस हा भारताच्या १४ दिवसांबरोबर असतो. चंद्राच्या जवळ पोहोचल्यानंतर 'चांद्रयान-2'ची गती कमी करण्यात येणार आहे. यानंतर पृष्ठभागापासून 100 किलोमीटर उंचीवर 'चांद्रयान-2' दोन फेऱ्या मारेल. तीन सप्टेंबरला विक्रम लॅंडर आणि प्रग्यान रोव्हर मुख्य यानापासून वेगळे होतील. त्यानंतर सात सप्टेंबरला लॅंडर चंद्रावर उतरेल

काय आहे अपोलो क्रेटर? 
अपोलो हे 538 किमी व्यासाचे डबल रिंगचा खड्डा आहे जो चंद्राच्या दक्षिण भागात आहे. चंद्रावर सर्वांत प्रथम पाऊल ठेवणाऱ्या नील आर्मस्ट्रॉंगच्या अपोलो 11 या मिशनमुळे या खड्ड्याला अपोलो असे नाव देण्यात आले आहे. 

काय आहे मरे ओरिएण्टल?
चंद्रावरील काळसर आणि मऊ भागाला मरे म्हणतात. याचा लॅटीनमध्ये अर्थ समुद्र असा होतो. अंतराळवीरांनी पूर्वी याजागी समुद्र असल्याचा दावा केल्याने याला मरे हे नाव पडले. मरे हे चंद्राच्या अत्यंत पश्चिम भागात आहे आणि पृथ्वीच्या बाजूने दिसणे अशक्य आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrayaan2 clicks 1st photo of Moon clearly shows Apollo Crater and Mare Orientale