सेटलवाड यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल

वृत्तसंस्था
बुधवार, 4 जानेवारी 2017

गृह मंत्रालयाच्या अहवालानुसार, सेटलवाड यांच्या संस्थेने दोन लाख नव्वद हजार डॉलर आणि एक कोटी तीस लाखांहून अधिक रुपये असा परदेशातून आलेला निधी स्वीकारत कायद्याचा भंग केला आहे.

नवी दिल्ली - केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड, त्यांचे पती जावेद आनंद आणि त्यांच्या सबरंग कम्युनिकेशन्स या संस्थेविरोधात आरोपपत्र दाखल केले.

पूर्वपरवानगी न घेता आणि नोंदणी न करता विदेशातून निधी स्वीकारल्याबद्दल सीबीआयने त्यांच्याविरोधात गुन्हेगारी स्वरूपाचा गुन्हा दीड वर्षापूर्वी दाखल केला होता. जुलै 2015 मध्ये केंद्रीय गृहमंत्रालयाने या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केल्यानंतर सेटलवाड यांच्या मुंबई येथील निवासस्थानावर छापेही टाकण्यात आले होते. गृह मंत्रालयाच्या अहवालानुसार, सेटलवाड यांच्या संस्थेने दोन लाख नव्वद हजार डॉलर आणि एक कोटी तीस लाखांहून अधिक रुपये असा परदेशातून आलेला निधी स्वीकारत कायद्याचा भंग केला आहे.
 

Web Title: Charge sheet against Teesta Setalvad