आडवानींविरुद्ध आज आरोप निश्‍चिती शक्‍य

पीटीआय
गुरुवार, 25 मे 2017

लखनौ : बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी सीबीआयचे विशेष न्यायालय उद्या भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवानी व अन्य आरोपींविरुद्ध आणखी आरोप ठेवण्याची शक्‍यता आहे.

लखनौ : बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी सीबीआयचे विशेष न्यायालय उद्या भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवानी व अन्य आरोपींविरुद्ध आणखी आरोप ठेवण्याची शक्‍यता आहे.

सीबीआयच्या न्यायालयात या प्रकराणाची 20 मे पासून दररोज सुनावणी सुरू झाली आहे. ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवानी, केंद्रीयमंत्री उमा भारती, मुरलीमनोहर जोशी यांच्यासह अन्य आरोपींविरुद्ध कट रचल्याच्या आरोपावरून खटला चालविण्याचा आदेश सर्वोच्य न्यायालयाने 19 एप्रिलला दिला होता.

हे प्रकरण रायबरेलीहून लखनौला वर्ग करण्यात आले आहे. सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयच्या विशेष न्यायालयाने या सर्वांवर आरोप निश्‍चित करण्यास सांगितले आहे. त्यासाठी 25 मे ही तारीख निश्‍चित केल्याची माहिती विशेष सरकारी वकिलांनी दिली. वरील तिघांव्यतिरिक्त या प्रकरणी विनय कटियार, साध्वी ऋतंभरा, विष्णु हरि दालमिया या भाजपच्या अन्य नेत्यांवरही आरोप आहेत.

Web Title: charges against advani can be fixed soon