उन्नाव बलात्कारप्रकरणी भाजप आमदारविरुद्ध आरोपपत्र 

पीटीआय
गुरुवार, 12 जुलै 2018

तपासादरम्यान सीबीआयने उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेने केलेल्या आरोपाची खातरजमा केली होती. 4 जून रोजी भाजपचे आमदार कुलदीपसिंह सेंगर यांनी बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला होता.

लखनौ : उन्नाव सामूहिक बलात्कारप्रकरणी सीबीआयने आज भाजपचे आमदार कुलदीपसिंह सेंगर यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. तत्पूर्वी सीबीआयने पीडित मुलीच्या वडिलाच्या हत्येप्रकरणी पाच जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. या पाच जणात आमदार कुलदीपसिंह यांचे बंधू अतुलसिंह सेंगर यांचा समावेश आहे. 

तपासादरम्यान सीबीआयने उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेने केलेल्या आरोपाची खातरजमा केली होती. 4 जून रोजी भाजपचे आमदार कुलदीपसिंह सेंगर यांनी बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याचवेळी त्यांची महिला सहकारी शशीसिंह खोलीबाहेर पहारा देत होती, असे म्हटले होते. कुलदीपसिंह सेंगर, शशीसिंह आणि अन्य चार आरोपींना सीबीआयने या वर्षी 13-14 एप्रिलला अटक केली होती. या तपासप्रकरणी भाजप सरकारवर टीका होऊ लागल्याने हा तपास सीबीआयकडे सुपूर्त केला.  

 
 

Web Title: Chargesheet against BJP MLA in Unnao rape case