अण्णा द्रमुकच्या नेत्याची भररस्त्यात हत्या

वृत्तसंस्था
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

या प्रकरणी द्रमुकचा कार्यकर्ता पंक बाबू याच्यासह अन्य दोघांनी पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले आहे. दोन कोटी रुपयांच्या व्यवहारातून ही हत्या झाल्याचा संशय आहे.

चेन्नई - अण्णा द्रमुकचा नेता व्ही. कनाकराज (वय 55) यांची रविवारी तिघांनी चाकून भोसकून भररस्त्यात हत्या केली.

या हत्याकांडाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, हल्लेखोर कनाकराज यांचा मृत्यू झाला की नाही, हे पाहत असल्याचे समोर आले आहे. तिरुवेन्नामलाई येथील अरुणाचलेश्वर मंदिराजवळ रविवारी दुपारी ही घटना घडली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी द्रमुकचा कार्यकर्ता पंक बाबू याच्यासह अन्य दोघांनी पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले आहे. दोन कोटी रुपयांच्या व्यवहारातून ही हत्या झाल्याचा संशय आहे. कनाकराज यांचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय होता. ते महापालिकेत जात असताना त्यांच्यावर दुचाकीवरून येऊन हल्ला करण्यात आला. 

Web Title: Chennai: Brutal murder of AIADMK ex-councillor caught on camera