Chandrayaan 2 : मला विक्रम लॅंडर सापडलाय; चेन्नईच्या इंजिनिअरने केले नासाला जागे

वृत्तसंस्था
Tuesday, 3 December 2019

''सर्वप्रथम शानमुगा याला सापडलेले तुकडे विक्रम लँडरच्या चंद्रावर ज्या ठिकाणी लँडींग होणार होते, तिथपासून 750 मीटर अंतरावर सापडले आहेत,'' असे नासाने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

चेन्नई : इस्रोच्या महत्वाकांक्षी 'चांद्रयान 2'च्या विक्रम लॅंडरचे तुकडे सापडल्याची माहिती नासाने ट्विटरवरुन आज दिली. मात्र, हा विक्रम लॅंडर शोधण्यात एका भारतीयानेच नासाची मदत केली आहे. चेन्नईतील शानमुगा सुब्रमण्यम या इंजिनिअरने सर्वांतआधी नासाला विक्रम लॅंडरच्या अस्तित्वाबद्दल सावध केले आणि त्यामुळेच त्याचे तुकडे सापडले. नासाने त्याबद्दल शानचे आभारही मानले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शानमुगाला विक्रम लॅंडरचे तुकडे सापडले. याच तुकड्यांचा शास्त्रज्ञ शोध लावत होता. या तुकड्यांमुळे विक्रम लॅंडर कोठे क्रॅश झाले याची माहिती मिळाली. 

''सर्वप्रथम शानमुगा याला सापडलेले तुकडे विक्रम लँडरच्या चंद्रावर ज्या ठिकाणी लँडींग होणार होते, तिथपासून 750 मीटर अंतरावर सापडले आहेत,'' असे नासाने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे. विक्रम लँडरचे हे तुकडे सर्वप्रथम शानमुगाला सापडले होते. विक्रम लँडरला शोधण्यात नासाला अपयश आल्यानेच त्याची विक्रम लँडरला शोधण्याची उत्सुकता वाढली होती असेही त्याने स्पष्ट केले. 

Chandrayaan 2 : मोठी बातमी! विक्रम लँडर सापडला, नासाने केले फोटो ट्विट

''मी दोन लॅपटॉपवर चंद्राच्या पृष्ठभागाचे दोन फोटो शेजारी शेजारी लावून ठेवले होते. एकावर जुना फोटो होता तर दुसऱ्यावर नासाने दिलेला नवा फोटो होता. विक्रम लँडरचे तुकडे शोधणे अवघड होतं पण मी त्यासाठी खूप मेहनत घेतली,'' अशी माहिती शानमुगाने दिली. 

Image

त्याने ऑक्टोबर तीन तारखेला याबाबत नासाला टॅग करत ट्विटरवरुन ही माहिती दिली होती. त्यानंतर नासाने पुढील संशोधन करुन अखेर आज विक्रम लॅंडरचे तुकडे सापडल्याची माहिती दिली. त्याच्या या कामगिरीसाठी नासाने त्याचे आभारही माले आहेत. 

नासातल्या शास्त्रज्ञाने शानमुगाच्या या कामाचे कौतुकही केले आहे. ते म्हणाले '' याचा शोध ज्या एकट्या माणसाने लावला, ज्याने आम्हाला विक्रम लॅंडर शोधण्यास मदत केली त्याची कथा फारच प्रेरणादायी आणि भारी आहे. तो ना लूनार रेकनेन्सेस ऑर्बिटर मिशनसाठी काम करतो ना इस्रोसाठी काम करतो. त्याला फक्त चांद्रयान 2 च्या मोहिमेत खूप रस होता.''

चांद्रयानाच्या विक्रम लँडरचे (Vikram Lander) तुकडे सापडल्याची माहिती नासाने ट्विटरवरून दिली आहे. नासाच्या 'Nasa Moon' या त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी ही माहिती दिली. या अकाऊंटवर विक्रम लँडरच्या तुकड्यांचा फोटो ट्विट करण्यात आला आहे. 7 सप्टेंबरला इस्रोचा विक्रम लँडरशी संपर्क तुटला होता. त्यानंतर अनेक प्रयत्न करूनही विक्रमशी संपर्क होऊ शकला नाही.

नासाच्या लूनार रेकनेन्सेस ऑर्बिटरने विक्रम लँडरचे हे फोटो टिपले आहेत. चंद्राच्या पृष्ठभागावर पडलेले हे फोटो साधारण एक किलोमीटरच्या अंतरावरून काढलेले आहेत. विक्रम लँडरच्या चंद्रावर ज्या ठिकाणी लँडींग होणार होते, तिथपासून 750 मीटर अंतरावर नासाला हे तुकडे सापडले आहेत. या फोटोत विक्रमचे तीन तुकडे दिसत आहेत. ते साधारण 2*2 पिक्सलचे असल्याची शक्यता आहे. 

विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर क्रॅश झाल्याने त्याचा पृष्ठभागावरील परिणाम या फोटोंमध्ये दिसून येत आहे. या परिणाम झालेल्या भागाला 'Impact Site' असे नाव देण्यात आले आहे. इस्रोने याबाबतची सविस्तर माहिती नासाकडे मागितली आहे. या फोटोबद्दल नासा एक अहवाल इस्रोला देणार असून, पुढील संशोधन त्याप्रमाणे करण्यात येईल. विक्रमची माहिती मिळण्याची शक्याता यापूर्वीच नासाने वर्तवली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chennai Engineer alerted NASA that he has found Vikram Lander