रिफायनरीच्या कार्यालयावर प्राप्तिकर विभागाचे छापे

यूएनआय
गुरुवार, 18 मे 2017

संपूर्ण दक्षिण विभागात 50 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले असून त्यात तमिळनाडूत 46 ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. चेन्नईतच 35 हून अधिक ठिकाणांचा समावेश असून त्यात मालकाच्या मलयपूर परिसराचाही समावेश आहे

चेन्नई - कर चुकविल्याबद्दल प्राप्तिकर विभागाने आज कलीसुवरी रिफायनरी प्राव्हेट लि. च्या कंपनीवर आणि मालकाच्या घरावर छापे टाकले.

संपूर्ण दक्षिण विभागात 50 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले असून त्यात तमिळनाडूत 46 ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. चेन्नईतच 35 हून अधिक ठिकाणांचा समावेश असून त्यात मालकाच्या मलयपूर परिसराचाही समावेश आहे. या छापा सत्रात प्राप्तिकर विभागाचे शंभरहून अधिक अधिकारी सहभागी झाले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

कलीसुवरी रिफायनरी हा खाद्य तेलाची कंपनी असून सनफ्लॉवर तेलाचे मुख्य उत्पादन करते. आज सकाळी सातच्या सुमारास हा छापा टाकण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून कर चुकविल्याची तक्रार आल्याने हे छापे टाकण्यात आले.

Web Title: Chennai: I-T department raids Kaleesuwari Refinery Oil Private Limited