कुत्र्याच्या पिल्लांवर बलात्कार करणारा सीसीटीव्हीत कैद

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 मार्च 2019

विकृताने पँटची चेन काढली आणि पिल्लांवर लैंगिक अत्याचार करू लागला. महिलेने हे कृत्य पाहिल्यानंतर आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत त्याने घटनास्थळावरून पळ काढला.

चेन्नईः एका विकृताने कुत्र्याच्या नवजात पिल्लांवर बलात्कार केला असून, संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. महिलेने प्रत्यक्ष घटना पाहिल्यानंतर पोलिसांकडे तक्रार दाखल केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, महिलेच्या घराजवळ असलेल्या एका मोकळ्या जागेवर कुत्र्याची पिले खेळत होती. 15 दिवसांपूर्वीच या पिलांचा जन्म झाला होता. विकृत घटनास्थळी गेल्यानंतर त्याने कुत्र्याच्या पिल्लांना उचलून जवळ घेतले. सुरुवातीला ती व्यक्ती पिल्लांना आश्रय देण्याचा प्रयत्न करत आहे, असे प्रत्यक्षदर्शी महिलेला वाटले. पण, विकृताने पँटची चेन काढली आणि पिल्लांवर लैंगिक अत्याचार करू लागला. महिलेने हे कृत्य पाहिल्यानंतर आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत त्याने घटनास्थळावरून पळ काढला. संबंधित महिला त्या पिलांची काळजी घेत आहेत.

विकृताला यापूर्वीही आपण पाहिले आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिले आहे. परंतु, फुटेज अस्पष्ट असल्यामुळे आरोपीची ओळख पटत नाही, असे महिलेने सांगितले. दरम्यान, पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. संबंधित वृत्त मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून, नेटिझन्सनी याबाबत चीड व्यक्त केली आहे.

Web Title: Chennai Man rapes newly born puppies and horrific act caught on CCTV