"ब्लू'विरोधात स्टॅलिन गृहमंत्रालयाकडे

वृत्तसंस्था
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

सोशल मिडियातील लिंक्‍स हटविण्याची मागणी

चेन्नई : "ब्लू व्हेल' या ऑनलाइन गेममुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले असून या गेमच्या इंटरनेट आणि सोशल मिडियावरील लिंक्‍स तातडीने हटविण्यात याव्यात अशी मागणी द्रमुकचे कार्याध्यक्ष एम.के.स्टॅलिन यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्याकडे केली आहे. तमिळनाडूतील नेटकऱ्यांची मोठी संख्या लक्षात घेता गृहमंत्रालय आणि इलेक्‍ट्रॉनिक्‍स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यावर उपाययोजना आखतील अशी आशा स्टॅलिन यांनी गृहमंत्री राजनाथसिंह यांना लिहिलेल्या पत्रामध्ये व्यक्त केला आहे.

"ब्लू व्हेल'चा विद्यार्थ्यांवरील प्रभाव दिवसेंदिवस वाढताना दिसून येतो असे सांगत त्यांनी मदुराईमधील एका 19 वर्षाच्या विद्यार्थ्याने केलेल्या आत्महत्येचे उदाहरण दिले आहे. डिजिटल गेम्सचा विद्यार्थ्यांच्या मनोअवस्थेवर विपरित परिणाम होतो आहे. भावनिकदृष्ट्या त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम हे गेम करत असल्याचे स्टॅलिन यांनी म्हटले आहे.

उच्च न्यायालयात सुनावणी
मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठासमोर "ब्लू व्हेल' विरोधातील याचिकांवर सुनावणी होणार आहे. मदुराईमधील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर हे प्रकरण आता न्यायालयासमोर आले आहे. एकट्या मदुराई शहरामध्ये 75 पेक्षाही अधिक विद्यार्थी हा गेम खेळत असावेत असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. यासाठी राज्य सरकारने एक हेल्पलाईनही सुरू केली आहे.

रशियात ऍडमिनला अटक
रशियामध्ये "ब्लू व्हेल' गेमची ऍडमिन असलेल्या एका सतरा वर्षांच्या मुलीस अटक करण्यात आली आहे, ही मुलगी गेम खेळणाऱ्या मुलांना त्यांच्या नातेवाईकांना जिवे मारण्याची धमकी देत असत. रशियामध्ये या गेममुळे अनेक मुलांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. पण मुख्य ऍडमिन हीच मुलगी आहे का याबाबत मॉस्कोतील तपास यंत्रणा साशंक आहेत. ही मुलगी गेम खेळणाऱ्या मुलांचा शारीरिक आणि मानसिक छळ करत असे.

Web Title: chennai news blue vale game and social media