मुलीच्या लग्नासाठी नलिनीने मागितली सहा महिन्यांची रजा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 जुलै 2017

मद्रास उच्च न्यायालयात केला अर्ज

चेन्नई: दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या नलिनी श्रीहरन हिने आपल्या मुलीच्या लग्नासाठी सहा महिन्यांची रजा मद्रास उच्च न्यायालयाला मागितली आहे. नलिनीला वेल्लोरच्या महिलांसाठीच्या विशेष तुरुंगात ठेवण्यात आले आहे. नलिनीने संचित रजेसाठी तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि तुरुंगाच्या निरीक्षकांकडे अर्ज केला असला, तरी आपल्याला त्याबाबत अद्याप उत्तर आलेले नाही, असे तिने सांगितले.

दोन वर्षांतून एक महिना रजा घेण्यासाठी मी हक्कदार असून गेल्या 26 वर्षांपासून मी तुरुंगात असून मी एकदाही रजा घेतलेली नाही, असे तिने आपल्या अर्जात म्हटले आहे. लंडनमध्ये आपल्या आजी- आजोबांबरोबर राहणारी आपली मुलगी हरिथरा हिच्या लग्नाची तयारी करायची आहे. त्यामुळे 12 नोव्हेंबर 2016 रोजी आपण मुख्यमंत्र्यांकडे सहा महिन्यांची संचित रजा मिळण्यासाठी अर्ज केला आहे, असे तिने आपल्या याचिकेत म्हटले आहे. मात्र आपल्या मागणीला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे मी 23 जानेवारी रोजी तुरुंग महासंचालकांकडे दुसरा अर्ज केला आहे, मात्र त्यांनीही आपल्याला कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे आपण न्यायालयात धाव घेतल्याचे नलिनी हिने आपल्या अर्जात म्हटले आहे. तिच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी होण्याची शक्‍यता आहे. नलिनीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती, मात्र राज्य सरकारने त्यात बदल करून तिला आजीवन कारावासाची शिक्षा मंजूर केली.

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्यांसाठी क्लिक करा :

जेफ बेझोस ठरले जगात सर्वांत श्रीमंत 
कर्जमाफी की कर्जवसुली?
पंतप्रधान पीकविमा योजनेतून शेतकऱ्यांपेक्षा कंपन्यांनाच अधिक धनलाभ 
स्वार्थी नितीश कुमार यांनी दगा दिला- राहुल गांधी 
टोमॅटो विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट 
पुनर्गठित कर्जदारांनाही माफी - मुख्यमंत्री
लालूप्रसाद, राहुल यांना योग्य वेळी उत्तर देऊ: नितीशकुमार
राज्यातील 82 पेट्रोल पंपांत मापात पाप 
परराष्ट्रमंत्र्यांना खोटे ठरविण्याचा काँग्रेसचा अजेंडा: सुषमा स्वराज
मुजोर बॅंक अधिकाऱ्यांना धडा शिकवा - सुनील तटकरे 
काँग्रेसचे तीन आमदार भाजपच्या कळपात
महिला तस्करी रोखावीच लागेल - मुख्यमंत्री

Web Title: chennai news nalini sriharan girl marriage leave court