मीरा कुमार, कोविंद आज तमिळनाडूत

वृत्तसंस्था
शनिवार, 1 जुलै 2017

चेन्नई: भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी व राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद व कॉंग्रेसच्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या उमेदवार मीरा कुमार शनिवारी (ता. 1 जुलै) तमिळनाडूला भेट देण्याची शक्‍यता आहे. तेथील राजकीय पक्षांच्या नेत्यांना भेटून पाठिंब्यासाठी ते दोघे आवाहन करणार आहेत.

अण्णा द्रमुक पक्षाच्या दोन्ही गटांच्या खासदार व आमदारांना कोविंद उद्या भेटणार आहेत. अण्णा द्रमुकने यापूर्वीच कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पक्षाच्या अम्मा गटाचे नेतृत्व मुख्यमंत्री इडापड्डी के. पलानीस्वामी यांनी कोविंद यांना सर्वप्रथम पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर पनीरसेल्वम यांच्या गटाने पाठिंबा दिला. मीरा कुमार याही उद्या चेन्नईत येणार असून, कॉंग्रेसचे राज्यातील नेते तसेच द्रमुकसह अन्य सहकारी पक्षांच्या नेत्यांना त्या भेटणार आहेत.

Web Title: chennai news president election and meira kumar