तमिळनाडूत 200 कोटींची स्थावर मालमत्ता जप्त

वृत्तसंस्था
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

ग्रॅनाईट गैरव्यवहार प्रकरणी "ईडी'ची कारवाई

चेन्नई: तमिळनाडूतील ग्रॅनाईट गैरव्यवहार प्रकरणी चेन्नईतील सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सुमारे दोनशे कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. या प्रकरणी "ईडी'ने काही ग्रॅनाईट व्यावसायिकांशी संबंधित 517 स्थावर मालमत्ता जप्त केल्या असल्याचे सांगण्यात आले.

पैशांची अफरातफर केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली असल्याचे "ईडी'च्या संयुक्त संचालकांनी स्पष्ट केले. या ग्रॅनाईट व्यावसायिकांच्या विरोधात 2013 मध्ये पोलिसांत प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला होता. तमिळनाडूमध्ये अनेक ठिकाणी सरकारच्या मालकीच्या जागेतून विविध रंगी ग्रॅनाईट खनिजाचे उत्खनन केल्याचा आरोप या व्यावसायिकांच्या विरोधात ठेवण्यात आला आहे.

2001 ते 2012 या काळात हा गैरव्यवहार झाला असल्याचे "ईडी'चे म्हणणे आहे. या प्रकरणी "ईडी'ने दोनशे कोटी रुपये किमतीच्या 517 स्थावर मालमत्ता जप्त केल्या असल्याचे सांगण्यात आले. "ईडी'ने या संदर्भात आज एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यात कारवाईच्या संदर्भात माहिती देण्यात आली आहे.

Web Title: chennai news Tamil Nadu seizes immovable property worth 200 crores