चेन्नईचा किनारा 90 टक्के स्वच्छ 

पीटीआय
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

चेन्नई- तेलगळतीनंतर काळवंडलेला चेन्नईचा समुद्रकिनारा 90 टक्के स्वच्छ करण्यात यंत्रणेला यश आले आहे. आतापर्यंत 65 टन तेल समुद्रातून बाहेर काढण्यात आले असून ही स्वच्छता मोहीम आणखी दोन दिवस सुरू राहण्याची शक्‍यता आहे. "इंडियन ऑईल कार्पोरेशन' ही कंपनी या मोहिमेत सहभागी झाली असून समुद्रातून बाहेर काढण्यात आलेल्या तेलाची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावता यावी म्हणून काही जैविक सामुग्रीही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दोन जहाजांच्या अपघातानंतर हे गळती झालेले तेल जेव्हा पाणी आणि वाळूमध्ये मिसळले तेव्हा ते अधिक घट्ट आणि मऊ बनले. यामुळे गळती झालेले तेल आणि त्यानंतर समुद्रातून काढण्यात आलेला त्यांचा अंश यामध्ये खूप मोठी तफावत आढळून आली आहे असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले."सुपर सकर्स'च्या माध्यमातून पाण्यातून 54 टन तेल वेगळे काढण्यात आले आहे. समुद्रातून बाहेर काढण्यात आलेला तेलाचा अंश जैविक प्रक्रियेसाठी एन्नोर पोर्ट परिसरामध्ये आणला जात असून त्यासाठी "एचपीसीएल' कंपनीने वेगळे ट्रेलर्स आणि मनुष्यबळ उपलब्ध करून दिला आहे. या प्रक्रियेसाठी पोर्ट परिसरामध्ये 2 हजार स्क्वेअर मीटरचा खड्डा खणण्यात आला आहे. चेन्नई पोर्ट आणि तमिळनाडू सरकारने एर्नावूर आणि कासीमेडू येथे आरोग्य शिबिरांचे आयोजन केल्याचे समजते. 

देखरेख 
ज्या भागामध्ये तेलगळती झाली त्याची पाहणी करण्यासाठी पेट्रोलियम आणि नैसार्गिक वायू मंत्रालयाचे बडे अधिकारी नियुक्त करण्यात आले असून या भागातील जलवाहतूकही रोखण्यात आली आहे. या स्वच्छता मोहिमेवर देखरेख ठेवण्यासाठी चेन्नई आणि कामाराजर पोर्ट विभागाने दोन नियंत्रण कक्ष देखील उभारले आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली. 

Web Title: Chennai oil spill 90 per cent of clean up work complete