चेन्नई पोलिसांचे कृत्य सोशल मीडियातून 'व्हायरल'

वृत्तसंस्था
बुधवार, 25 जानेवारी 2017

पोलिस आयुक्त चौकशी करणार; कमल हसननेही विचारला जाब

चेन्नई: जलिकट्टूच्या समर्थनार्थ सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी दिलेल्या अमानवी वागणुकीचे व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल झाल्याने सध्या तमिळनाडूत संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्‍वासन पोलिस आयुक्तांनी दिले आहेत. अभिनेता कमल हसन यांनीदेखील पोलिसांच्या वागणुकीचा जाब विचारला आहे.

व्हिडिओमध्ये पोलिस कर्मचारी हे आंदोलनकर्त्यांना अतिशय क्रूरपणे मारहाण करताना दिसत आहेत, ऑटो पेटवून देत आहेत, गाड्यांची तोडफोड करताना दिसून येत आहेत. एक महिला आपल्या घराबाहेर उभी असताना एक पोलिस येतो आणि तिला दंडुक्‍याने बेदम मारहाण करतो. त्यानंतर दुसरा पोलिस कर्मचारी येतो आणि तोसुद्धा त्याच महिलेला मारहाण करतो, तिसरादेखील कर्मचारी मारायला उठतो; परंतु ती महिला घरात पळून जाते. पोलिसांच्या या अमानुष लाठीमारामुळे पोलिस खात्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी व्हिडिओ फुटेज पाहिल्यानंतर आणि खातरजमा झाल्यावरच दोषींविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असे चेन्नईच्या पोलिस आयुक्तांनी म्हटले आहे. पोलिस आयुक्त एस. जॉर्ज म्हणाले, की सोशल मीडियावरील खोट्या अफवांबाबत सजग राहणे गरजेचे आहे. मीसुद्धा व्हिडिओ पाहून हैराण झालो आहे. गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती मिळवत असून, ज्यांनी हे कृत्य केले आहे, त्याला शिक्षा होणारच. दरम्यान, अभिनेता कमल हसन यांनी याबाबत प्रश्‍न उपस्थित केला आहे. त्यांनी विचारणा केली, की हा काय प्रकार आहे, याबाबत कोणी उत्तर देईल का?

Web Title: chennai police action viral on social media