Chhath Puja : कोरोनाच्या संकटातही उत्साह; महिलांनी टबमध्ये उभारून केली पूजा

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 21 November 2020

 सर्वसाधारणपणे नदीत पवित्र स्नान करुन सूर्याची पूजा केली जाते. दोन वेळा ही पूजा केली जाते. एकदा ही पूजा सायंकाळी आणि त्यानंतर पहाटे केली जाते. प्रामुख्याने नदीच्या किनार्‍यावर किंवा जलाशयावर ही पूजा करतात. कोरोनाच्या संकटजन्य परिस्थितीत काही दिल्लीमध्ये हा उत्सव टबमध्ये पाणी घेऊन साजरा करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. 

देशभरातील विविध भागात  छट पूजेचा उत्साह दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य त्या खबरदारीसह काही भागात उत्सव साजरा झाल्याचे पाहायला मिळाले.  प्रामुख्याने उत्तर भागात या हा उत्सव साजरा केला जातो. सामूहिकरित्या सूर्याची पूजा करण्याची ही एक प्रथा आहे. अंग देशाचा राजा कर्ण (आताचा बिहारमधील भागलपूर जिल्हा) सूर्यपूजक होता. त्यानंतर ही परंपरा सुरू झाली. बिहारी लोक जिथे गेले तिथे त्यांनी ही प्रथा नेली. छटपूजेपूर्वी घर व परिसर अगदी स्वच्छ केले जाते. 

 सर्वसाधारणपणे नदीत पवित्र स्नान करुन सूर्याची पूजा केली जाते. दोन वेळा ही पूजा केली जाते. एकदा ही पूजा सायंकाळी आणि त्यानंतर पहाटे केली जाते. प्रामुख्याने नदीच्या किनार्‍यावर किंवा जलाशयावर ही पूजा करतात. कोरोनाच्या संकटजन्य परिस्थितीत काही दिल्लीमध्ये हा उत्सव टबमध्ये पाणी घेऊन साजरा करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. 

Image may contain: 9 people, people standing, crowd and outdoor

वाराणसी: गंगा नदीच्या किनाऱ्यावरही छट पूजेचा उत्साह पाहायला मिळाला. उगवत्या सूर्याला नमस्कार करुन भाविकांनी पारंपारिक सण साजरा केला. (फोटो पीटीआय)

Image may contain: one or more people, people standing, plant and flower

नवी दिल्लीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने घातलेल्या निर्बंधामुळे  सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करत महिला भाविकांनी टबमधील पाण्यात उभारुन हा उत्सुव साजरा केल्याचे पाहायला मिळाले. (फोटो पीटीआय)

Image may contain: 3 people, people standing and outdoor
पटना येथे गंगा नदीमध्ये स्नान करुन परंपरेनुसार काही महिलांनी छटपूजा केल्याचे पाहायला मिळाले. (फोटो पीटीआय)

Image may contain: one or more people and outdoor

जम्मूतील हिंदू धर्मिय महिलांनीही भक्तिभावाने पूजा केली. तावी नदीच्या तिरावर पारंपारिक सण साजरा करण्यात आला. (फोटो पीटीआय)

Image may contain: one or more people and outdoor

जम्मू येथील तावी तिरावरील छटपूजेच्या उत्सवाचा एक क्षण (फोटो पीटीआय)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chhath Puja Hindu women prayers stand in tubs with Yamuna water