छत्तीसगडच्या रुग्णालयात तीन बाळांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

रायपूरच्या रुग्णालयातील बाळांचा मृत्यू ही दुर्दैवी घटना असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल. या प्रकरणाची आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जाईल.
रमनसिंह, मुख्यमंत्री छत्तीसगड

ऑक्‍सिजनचा अपुरा पुरवठा; एक कर्मचारी निलंबित

रायपूर: छत्तीसगडच्या सर्वांत मोठ्या रायपूर येथील एका सरकारी रुग्णालयात कथित ऑक्‍सिजनअभावी तीन नवजात अर्भकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक उघडकीस आली आहे. मात्र अधिकाऱ्यांनी ही घटना ऑक्‍सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे झाल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. दरम्यान, ऑक्‍सिजन पुरवठा करणाऱ्या विभागातील एका कर्मचाऱ्याला कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी अटक केली आहे. मुख्यमंत्री रमणसिंह यांनी या प्रकरणातील गांभीर्य ओळखून चौकशीचे आदेश दिले आहे. गेल्या चोवीस तासांत तीन बाळांचा मृत्यू झाला आहे.

रायपूर येथील डॉ. भीमराव आंबेडकर रुग्णालयाच्या बालरुग्ण विभागात दाखल असलेल्या तीन बाळांचा गेल्या चोवीस तासांत मृत्यू झाला. मृत बाळांच्या नातेवाइकांनी ऑक्‍सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे घटना घडली असल्याचा आरोप केला आहे. परंतु या घटनेनंतर आरोग्य विभागाचे सचिव सुब्रत साहू यांनी तीन मुलांचा विविध कारणांनी मृत्यू झाल्याचे पत्रकारांना सांगितले. या घटनेनंतर ऑक्‍सिजनचा पुरवठा करणाऱ्या विभागातील एक कर्मचारी रवी चंद्रा यास अटक केल्याची माहिती दिली. त्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. काल सायंकाळी पाचच्या सुमारस बालरुग्ण विभागात डॉक्‍टरला मुख्य ऑक्‍सिजन टॅंकमध्ये ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी असल्याचे आढळून आले. ही पातळी दोनपर्यंत पोचली होती. त्यानंतर डॉक्‍टरने रवि चंद्रा याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्याशी संपर्क झाला नाही. मात्र तो मद्यधुंद अवस्थेत आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध तक्रार देण्यात आली. यादरम्यान, ऑक्‍सिजन पुरवठा पंधरा मिनिटांतच पूर्ववत करण्यात आल्याचे साहू म्हणाले.

Web Title: chhatisgarh news three baby died in hospital