कन्नडीगांची दादागिरी; हुक्केरीत महाराष्ट्रातल्या वाहनांची तोडफोड

. कन्नड रक्षण वेदिकेचे कार्यकर्त्यानी गाड्यांना कन्नड रक्षण वेदिकेचा झेंडा लावला.
Bengalur
BengalurESakal

बंगळूर (Bengalur) येथे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्यांची विटंबना केली. त्याचे पडसाद सीमाभागासह महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात उमटले. अनेक गावात निषेध मोर्चे व बंद पाळण्यात आले. शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आली. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांच्या वक्तव्यानंतर अनेक टिका-टिपण्णी झाली. बंगळूर घटनेने कोल्हापुरात कन्नड मालकीची हाॅटेल बंद केली, तर सांगलीत खाजगी वाहनांवर दगडफेक करण्यात आली. ठिकठिकाणी याचे पडसाद उमटत असतानाच परत बेळगाव जिल्ह्यात कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांचा धिंगाणा अजूनही सुरूच आहे.

हुकेरीमध्ये कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातल्या वाहनांची तोडफोड केली आहे. कन्नड रक्षण वेदिकेचे कार्यकर्त्यानी गाड्यांना कन्नड रक्षण वेदिकेचा झेंडा लावला, त्यामुळे पुन्हा महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. याआधीही मराठी संस्थांवर बंदी आणण्याचा प्रस्ताव कर्नाटकच्या विधानसभेत मांडला होता, त्यावर राष्ट्रवादीकडून टीका करण्यात आली आहे. आज पुन्हा कन्नडीगांच्या दादागिरीने हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

Bengalur
देवराष्ट्रेतील दत्तात्रयच्या कारनाम्यावर 'महिंद्रा' फिदा

आज कर्नाटक (Karnataka) सीमेवर म्हैसाळ-कागवाड (Mhaisal, Kagwad)दरम्यान म्हैसाळ येथे मिरज (Miraj) शिवसेनेकडून बुधवारी (ता. २२) जोरदार आंदोलन करण्यात आले. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai)यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यासह कर्नाटकच्या ध्वजाची होळी करण्यात आली. तर बेळगावमध्ये निघालेल्या निषेध मोर्चा व बंदला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील नेते जातील, या उद्देशाने सीमा तपासणी नाक्यावर नेत्यांना कर्नाटक प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या आधी महाराष्ट्रातील नेतेमंडळी कर्नाटकात असणाऱ्या कोगनोळी टोल नाक्यावर येऊन कर्नाटक सरकारचा निषेध करत. तसे आता न होण्यासाठी या ठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या चारचाकी वाहनांची कसून चौकशी करण्यात येत आहे. या वाहनांमधून मोर्चासाठी जाणाऱ्या नेतेमंडळींना परत महाराष्ट्रात पाठविण्यात येत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून कोगनोळी सीमा तपासणी नाक्यावर बंदोबस्त कडक करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com