मोदींकडून मराठीत ट्विट करून शिवाजी महाराजांना अभिवादन

वृत्तसंस्था
रविवार, 19 फेब्रुवारी 2017

छत्रपती शिवाजी महाराज यांनी नेहमीच प्रजेच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. ते एक उत्तम प्रशासकीय कौशल्य लाभलेले आदर्श राज्यकर्ते होते.

नवी दिल्ली - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) मराठीत ट्विट करून त्यांना आदरांजली वाहिली.

मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी त्यांना नमन. त्यांच्यासारखे शूर आणि महान व्यक्तिमत्व आपल्या भूमीत जन्मले याचा भारताला अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी नेहमीच प्रजेच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. ते एक उत्तम प्रशासकीय कौशल्य लाभलेले आदर्श राज्यकर्ते होते. शिवाजी महाराजांना अभिमान वाटेल असा भारत घडवण्यासाठी आम्ही अविरत प्रयत्नशील आहोत.

अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाविषयीही मोदींनी म्हटले आहे, की नुकतेच अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या भव्य शिवस्मारकचे जल-भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले. हा दिवस सदैव स्मरणात राहील. मोदींनी या ट्विटसह छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतानाचा फोटो प्रसिद्ध केला आहे.

Web Title: Chhatrapati Shivaji Maharaj on his Jayanti. India is proud that a valorous & great soul like him was born on our land: PM