छत्रपती शिवरायांचे अन् राजर्षी शाहूंचे वारस संसदेत एकत्र येतात तेव्हा...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 June 2019

छत्रपती उदयनराजे भोसले यांची दाढ दुखत होती. बुधवारी सकाळी सव्वा दहा वाजता त्यांनी संभाजीराजे छत्रपती यांना फोन केला. संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांना येण्यासाठी आग्रह केला. तो मान्य करून उदयनराजे कार्यक्रमासाठी आवर्जून आले.  

नवी दिल्ली : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त संसदेच्या प्रांगणात छत्रपती शिवरायांचे वारस उदयनराजे भोसले आणि छत्रपती राजर्षींचे वारस युवराज संभाजीराजे छत्रपती एकत्र आले. महाराष्ट्राच्या युगपुरूषांचे वारस संसदेत एकत्र आल्याचे फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाले. 

उदयनराजे राष्ट्रवादीचे लोकसभेचे खासदार आणि संभाजीराजे राज्यसभेचे. अलिकडच्या काळात राजकीय विचारधारा विभिन्न असली, तरी दोघांमध्ये मैत्र आणि परस्परांविषयी आदर आहेच. 

कालच्या कार्यक्रमासाठी संभाजीराजे छत्रपतींनी पुढाकार घेतला. महाराष्ट्रातील सर्व संसद सदस्यांना आमंत्रण दिले. छत्रपती उदयनराजेंना संभाजीराजांनी आवर्जून फोन केला आणि राजर्षी शाहू महाराजांच्या अभिवादन कार्यक्रमासाठी बोलाविले. 

'उदयनराजेंनी विनंती मान्य केली. ते आले, याचा मला आनंद आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील सर्व खासदारांना एकत्र आणता आले, याचे वैयक्तिक समाधान आहे. असेच महाराष्ट्रासाठीही एकत्र राहू,' असे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. 

छत्रपती उदयनराजे भोसले यांची दाढ दुखत होती. बुधवारी सकाळी सव्वा दहा वाजता त्यांनी संभाजीराजे छत्रपती यांना फोन केला. संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांना येण्यासाठी आग्रह केला. तो मान्य करून उदयनराजे कार्यक्रमासाठी आवर्जून आले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chhatrapati Udayanraje and Sambhajiraje Chhatrapati together in Parliament