छत्तीसगडमध्ये चकमक; जवान हुतात्मा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 जून 2019

- सीआरपीएफच्या 199 बटालियनमधील जवान हुतात्मा.

बिजापूर : छत्तीसगडमधील बिजापूर येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवान (सीआरपीएफ) आणि नक्षलवाद्यांमध्ये आज (शुक्रवार) चकमक झाली. या चकमकीत सीआरपीएफच्या 199 बटालियनमधील एक जवान हुतात्मा झाला. ही चकमक बिजापूर येथील केशकुतूल भागात झाली. 

बिजापूर येथे झालेल्या या चकमकीदरम्यान एका गावकऱ्याचाही मृत्यू झाला. सुरक्षा जवानांचे एक पथक सीआरपीएफच्या मदतीसाठी पाठवण्यात आले. हुतात्मा झालेला एक जवान सीआरपीएफच्या 199 बटालियनमध्ये सेवेत होता. तसेच दुसऱ्या एका ऑपरेशनदरम्यान सुरक्षा जवानांनी नक्षलवाद्यांची तळ नष्ट केले. 

दरम्यान, छत्तीसगमधील राजनंदगाव येथे चकमकीदरम्यान जवानांनी ही कारवाई केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chhattisgarh Bijapur Maoist Encounter CRPF Jawan Martyr