भाजपने 'काले अंग्रेज' म्हटल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले...

वृत्तसंस्था
बुधवार, 18 डिसेंबर 2019

छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारून भुपेश बघेल यांना एक वर्ष पूर्ण झाले. केंद्र सरकारकडून देशभरात लागू करण्यात आलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी पुस्तिका (एनआरसी) छत्तीसगडमध्ये लागू करण्याबाबत बघेल यांनी भूमिका मांडली. 

रायपूर : भाजपकडून समाजाचे ध्रुवीकरण करण्याचे आणि सत्तेत असेपर्यंत नागरिकांना विभागण्याचे काम सुरु असून, उलट भाजप नेते विरोधकांना काले अंग्रेज असे म्हणत आहेत, अशी जोरदार टीका छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारून भुपेश बघेल यांना एक वर्ष पूर्ण झाले. केंद्र सरकारकडून देशभरात लागू करण्यात आलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी पुस्तिका (एनआरसी) छत्तीसगडमध्ये लागू करण्याबाबत बघेल यांनी भूमिका मांडली. 

Image result for bhupesh baghel

आता अक्षय कुमारही देतोय अमित शहांना सल्ले!

बघेल म्हणाले, की नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने एनआरसी लागू करण्याचे आदेश दिले असले तरी त्यांच्या निर्णयाला विरोध करणारा मी पहिला आहे. तर, दुसरीकडे भाजप विरोधकांना काले अंग्रेज म्हणत आहे. नागरिकत्व विधेयकावरून आज पूर्ण देश पेटला असून, एकमेकांमध्ये भांडणे लावण्याचे काम सरकार करत आहे. समाजाचे ध्रुवीकरण करून सत्तेत राहायचे हा भाजपचे अजेंडा आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chhattisgarh chief minister bhupesh baghel hits out at bjp says wont sign NRC