Bike रायडर नव्हे हे तर एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत; VIDEO VIRAL

Bhupesh Baghel
Bhupesh Baghel
Summary

मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून तो व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. त्यानतंर मुख्यमंत्र्यांच्या बाइक रायडिंगची चर्चा सुरु आहे.

रायपूर - सध्या सोशल मीडियावर एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या बाइक राइडचा व्हिडिओ व्हायरल होतोय. खरंतर मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून तो व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. त्यानतंर मुख्यमंत्र्यांच्या बाइक रायडिंगची चर्चा सुरु आहे. छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांचा हा व्हिडिओ आहे. लाल रंगाचा शर्ट आणि जॅकेट घातलेले मुख्यमंत्री बघेल हे बाइक रायडिंग करताना दिसत आहेत. एवढंच नाही तर बघेल यांच्या व्हिडिओला बॅकग्राउंड म्युझिक म्हणून आय एम रायडर हे गाणं लावण्यात आलं आहे. (CM Bhupesh Baghel Bike Riding Video)

रायपूरमध्ये छत्तीसगढ मोटर स्पोर्ट असोसिएशनने सुपर क्रॉस बाइक रेसिंग चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित केली आहे. ५ आणि ६ मार्चला ही स्पर्धा होणार आहे. लोकांना यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री बघेल यांनी बाइक रायडिंग केली. याचा व्हिडिओ मुख्यमंत्री कार्यालयाने शेअर केला आहे.

Bhupesh Baghel
युद्धभूमीवर रशियन सैनिकाला युक्रेनच्या नागरिकांनी दिलं खायला

मुख्यमंत्री बघेल यांनी रेड शर्ट, ब्लॅक जॅकेट, गॉगल आणि हेल्मेट घातलं आहे. त्यांच्या या बाइक रायडिंगच्या व्हिडिओला आय एम रायडर हे गाणं ऐकू येतं. सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांच्या या बाइक रायडिंगच्या व्हिडिओचं कौतुक केलं जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com