छत्तीसगडमध्ये चकमक ; 11 नक्षलवादी ठार

वृत्तसंस्था
शनिवार, 28 एप्रिल 2018

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात पोलिस आणि नक्षलवाद्यांसोबत आज (शनिवार) चकमक झाली. या चकमकीत 11 नक्षलवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आले.

सुकमा : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात पोलिस आणि नक्षलवाद्यांसोबत आज (शनिवार) चकमक झाली. या चकमकीत 11 नक्षलवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आले. यापैकी दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. पोलिसांनी या नक्षलवाद्यांच्या चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत. घटनास्थळावरून 11 बंदुका, दारूगोळ्यासह इतर अन्य सामग्री पोलिसांनी जप्त केली.

पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेली ही चकमक आज सकाळी सुरु झाली. पोलिसांनी यातील 11 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. याबाबत बस्तरचे पोलिस महानिरीक्षक पी. सुंदरराज यांनी सांगितले, की जेव्हा आम्हाला याबाबतची माहिती मिळाली. तेव्हा बुरकापाल भागाच्या जंगलात नक्षलवाद्यांनी एक कॅम्प बनवले. या मोहिमेसाठी डीआरजी किंवा डीएफचे संयुक्त दल रवाना झाले. त्यानुसार अत्यंत योजनापूर्वक पोलिसांनी नक्षलवाद्यांना घेरण्याचे काम केले होते.  

येथील नक्षलवाद्यांनी अचानकपणे याठिकाणी गोळीबार सुरु केला. नक्षलवाद्यांच्या या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देण्यात आले. ही चकमक तब्बल दोन तास सुरु होती. पोलिसांकडूनही गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देण्यात आले. त्यामुळे नक्षलवाद्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. त्यानंतर करण्यात आलेल्या शोधमोहिमेदरम्यान पोलिसांना एक महिला आणि पुरुषाचा मृतदेह मिळाला.  

Web Title: Chhattisgarh encounter Case 11 maoists killed in Burkapal area in Sukma District